Tesla Model Y : दिल्लीत स्वस्त, मुंबईत महाग! बुकिंग रक्कम आणि EMI तपशील जाणून घ्या

WhatsApp Group

Tesla Model Y India Launch : अखेर ज्या क्षणाची भारतातील इलेक्ट्रिक वाहनप्रेमी वाट पाहत होते, तो क्षण आला आहे! एलन मस्क यांची कंपनी Tesla हिने भारतात आपले पहिले शोरूम मुंबईच्या BKC परिसरात सुरु केले असून, Tesla Model Y ही इलेक्ट्रिक SUV अधिकृतपणे भारतात लॉन्च करण्यात आली आहे.

टेस्ला Model Y ची किंमत किती आहे?

Model Y ची एक्स-शोरूम प्रारंभिक किंमत ₹59.89 लाख ठेवण्यात आली आहे. ही कार दोन व्हेरिएंट्समध्ये येते:

  1. RWD (Rear-Wheel Drive) – 500 किमी रेंज
  2. Long Range RWD – 622 किमी रेंज

दिल्ली, मुंबई आणि गुरुग्रामसाठी ऑन-रोड किंमती (RWD)

  • मुंबई: ₹61.07 लाख (स्टील्थ ग्रे)
  • दिल्ली: ₹61.06 लाख
  • गुरुग्राम: ₹66.76 लाख

कलर आणि इंटीरियर पर्याय

टेस्ला Model Y मध्ये 6 बाह्य रंग पर्याय (Stealth Grey, Pearl White, Diamond Black, Glacier Blue, Quicksilver, Ultra Red) आणि 2 इंटीरियर पर्याय (All-Black, Black & White) उपलब्ध आहेत.

टिप : पर्ल व्हाइटसाठी ₹95,000 आणि अल्ट्रा रेडसाठी ₹1.85 लाख अतिरिक्त भरावे लागतील.

EMI आणि डाउन पेमेंट

जर तुम्ही 6,10,000 रुपये डाउन पेमेंट दिले, तर RWD मॉडेलसाठी EMI सुमारे ₹1,14,088/महिना, तर Long Range साठी ₹1,29,184/महिना होईल. EMI 60 महिन्यांसाठी असून, 9% व्याज दर गृहित धरले आहे.

बुकिंग कशी कराल?

Tesla Model Y ची बुकिंग फक्त ₹22,220 मध्ये सुरू झाली आहे. इच्छुक ग्राहक Tesla च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन कलर आणि मॉडेल निवडून ऑनलाइन बुकिंग करू शकतात.

टेस्ला Model Y ची वैशिष्ट्ये

  • 500–622 किमी रेंज
  • प्रीमियम ड्युअल-टोन इंटीरियर
  • वेगवेगळे रंग पर्याय
  • परफॉर्मन्स आधारित इलेक्ट्रिक मोटर
  • Tesla चा सुपरचार्जिंग सपोर्ट

Leave a Comment