
Affordable Diesel SUV : भारतात SUV ची मागणी सातत्याने वाढत आहे. परंतु, डिझेल इंजिनसह परवडणाऱ्या SUV चा विचार केल्यास, पर्याय मर्यादित आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला 5 स्वस्त डिझेल SUV बद्दल माहिती देणार आहोत.
Bolero Neo ची किंमत 9.63 लाख ते 12.14 लाख रुपये आहे, तर बोलेरोची किंमत 9.79 लाख ते 10.80 लाख रुपये आहे. यामध्ये 1.5L टर्बो डिझेल इंजिन आहे. हे इंजिन बोलेरोमध्ये 74.9bhp/210Nm आणि बोलेरो निओमध्ये 100bhp/260Nm जनरेट करते.
Kia Sonet च्या डिझेल व्हेरिएंटची किंमत 9.95 लाख ते 14.89 लाख रुपये आहे. यात एकूण 11 डिझेल व्हेरिएंट आहेत, जे 1.5 लीटर टर्बो डिझेल इंजिनसह येतात, हे इंजिन 115bhp आणि 250Nm आउटपुट देऊ शकते.
हेही वाचा – 2023 Honda Gold Wing Tour : होंडाने लाँच केली ‘कडक’ बाईक, किंमत असेल…
Mahindra XUV300 च्या डिझेल व्हेरिएंटची किंमत 10.21 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 14.76 लाख रुपयांपर्यंत जाते. यात एकूण 9 डिझेल व्हेरिएंट आहेत, जे 1.5 लीटर टर्बो डिझेल इंजिनसह येतात. हे इंजिन 115bhp आणि 300Nm आउटपुट देऊ शकते.
Hyudai Venue च्या डिझेल व्हेरिएंटची किंमत 10.46 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 13.48 लाख रुपयांपर्यंत जाते. हे 1.5 लीटर टर्बो डिझेल इंजिनसह देखील उपलब्ध आहे. हे इंजिन 115bhp/250Nm जनरेट करते.
Tata Nexon च्या डिझेल व्हेरिएंटची किंमत 11 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 15.50 लाखांपर्यंत जाते. यात एकूण 30 डिझेल प्रकार उपलब्ध आहेत, ज्यात 1.5 लिटर डिझेल इंजिन आहे. हे 115bhp/260Nm जनरेट करू शकते.