
Auto News In Marathi : आपली गाडी अधिक चांगली आणि सुरक्षित बनवण्यासाठी सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. गाडी जितकी सुरक्षित असेल, तितका प्रीमियम कमी असेल. स्टार रेटिंग असलेल्या गाड्यांना विमा प्रीमियममध्ये सूट मिळेल. Bharat NCAP मध्ये 5 स्टार रेटिंग असलेल्या गाड्यांसाठी विमा प्रीमियममध्ये सवलत असेल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MORTH) या प्रस्तावावर विचार करत आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या वर्षी ऑगस्ट महिन्यात भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (Bharat NCAP) लाँच केला होता. 3.5 टन पर्यंत मोटार वाहनांच्या रस्ता सुरक्षा मानकांमध्ये सुधारणा करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. केंद्र सरकारचा विश्वास आहे की उच्च सुरक्षा मानकांमुळे भारतीय गाड्यांना जागतिक बाजारपेठेत चांगली स्पर्धा करण्यास मदत होईल आणि भारतीय कार उत्पादकांच्या निर्यात क्षमतेला चालना मिळेल.
Bharat NCAP हा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) सुरू केलेला एक सुरक्षा मूल्यांकन उपक्रम आहे. भारतातील 3.5 टन पेक्षा कमी वजनाच्या आणि आठ प्रवासी बसू शकतील अशा प्रवासी वाहनांच्या सुरक्षा कामगिरीचे मूल्यांकन करणे हा त्याचा उद्देश आहे.
हेही वाचा – टाटा हॅरियर आणि सफारीमध्ये लागणार नवे इंजिन! जाणून घ्या खासियत
Bharat NCAP अंतर्गत कार क्रॅश चाचणी दोन प्रकारे केली जाईल. यामध्ये फ्रंट आणि साइड क्रॅश टेस्ट घेण्यात येणार आहेत. महागड्या आणि आलिशान कारमध्ये अनेक फीचर्स प्रदान केली जातात, परंतु कमी किमतीच्या कार आणि कोणत्याही सामान्य नागरिकासाठी उपलब्ध असलेले पर्याय देखील सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक मजबूत केले पाहिजेत.