
New Electric Scooter In Marathi : तुम्हीही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता एक तैवानची कंपनी आपली इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. देशातील इलेक्ट्रिक स्कूटरची वाढती विक्री आणि लोकांचा बदलता दृष्टिकोन पाहून कंपनीने खास भारतीय खरेदीदारांना डोळ्यासमोर ठेवून ही स्कूटर तयार केली आहे. या स्कूटरची खासियत म्हणजे तिची कमी किंमत आणि रेंज. कंपनी आपली Gogoro GX250 इलेक्ट्रित स्कूटर भारतीय ऑटोमोबाईल बाजारात लाँच करण्याच्या तयारीत आहे. ओला आणि एथरच्या स्कूटर्सशी थेट स्पर्धा होणार आहे.
याआधी, Gogoro भारतात दोन गाड्या लाँच करण्याच्या तयारीत होती, ही सुपर स्पोर्ट आणि 2 मालिका होती, परंतु आता कंपनी गोगोरो डिलाइट, विवा आणि एस1 देखील बाजारात आणणार आहे.

हेही वाचा – जबरदस्त फोल्डेबल ई-सायकल, आनंद महिंद्रांनीही केलीय गुंतवणूक!
नवीन स्कूटरची रेंज काय असेल?
Gogoro GX 250 मध्ये 7 kWh चा बॅटरी पॅक आहे. स्कूटरच्या रेंजबद्दल बोलायचे झाले तर ती एका चार्जवर 112 किलोमीटर चालते. ही स्कूटर चार्ज करण्यासाठी 180 मिनिटे म्हणजेच 3 तास लागतील. जर आपण स्कूटरच्या टॉप स्पीडबद्दल बोललो तर ती 60 किलोमीटर प्रति तास असेल.
किती खर्च येईल?
आत्तापर्यंत असा दावा केला जात आहे, की ही स्कूटर या रेंजमधील सर्वात स्वस्त स्कूटर असेल. सध्या कंपनीने त्याची किंमत जाहीर केलेली नाही पण चर्चा आहे की ती 60 हजार रुपयांच्या रेंजमध्ये लाँच केली जाऊ शकते.