
Honda Bike Scooter Offers In Marathi : होंडा टू-व्हीलर कंपनीने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी ऑफर्स जाहीर केल्या आहेत. कंपनी आपल्या बाइक आणि स्कूटर रेंजवर आकर्षक सूट आणि ऑफर देत आहे. या सणासुदीच्या मोसमात तुम्ही होंडा बाईक आणि स्कूटरवर किती बचत करू शकता ते जाणून घ्या.
कंपनी कोणत्याही होंडा बाईक किंवा स्कूटरच्या खरेदीवर 5,000 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. याशिवाय, जर तुम्हाला कर्जावर वाहन खरेदी करायचे असेल, तर कंपनी शून्य डाउन पेमेंटची सुविधा देखील देत आहे ज्यामध्ये तुम्हाला 100% फायनान्स सुविधा मिळेल.
याशिवाय, कर्जावर बाईक किंवा स्कूटर खरेदी करण्यासाठी 6.99% किमान व्याज दर लागू होईल. फायनान्सची लांबलचक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, कंपनीने हायपोस्क्रिप्शनची प्रक्रिया देखील काढून टाकली आहे. याशिवाय कंपनीने नवीन शाईन 100 वर ‘100 pe 100’ ऑफर लाँच केली आहे.
हेही वाचा – थार, जिम्नीवाली मजा पाहिजे? फक्त 6 लाखात मिळते ‘ही’ गाडी!
होंडाने नुकतीच OBD-2 कंप्लायंट CB300R भारतात लाँच केली आहे. या बाईकची किंमत 2.40 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे, जी जुन्या मॉडेलच्या तुलनेत ती 37,000 रुपये स्वस्त आहे. भारतीय बाजारपेठेत ही बाईक Dominar 400, TVS Apache RTR 310, KTM 390 Duke आणि BMW G310 R शी स्पर्धा करते.
Honda CB300R मध्ये 286cc सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल्ड इंजिन आहे जे 29.98 bhp पॉवर आणि 27.5 Nm टॉर्क जनरेट करते. ही बाईक स्लिप आणि असिस्ट क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.