ह्युंदाईच्या ‘या’ इलेक्ट्रिक कारने लोकांना अक्षरश: लावले वेड, रेकॉर्ड प्रमाणात विक्री!

WhatsApp Group

दक्षिण कोरियन कार उत्पादक कंपनी ह्युंदाईने यावर्षाच्या सुरुवातीला ऑटो एक्सपो दरम्यान आपली शक्तिशाली इलेक्ट्रिक कार Hyundai IONIQ 5 लाँच केली. तेव्हापासून आतापर्यंत कंपनीचा या कारला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ह्युंदाईने आतापर्यंत या कारचे 1000 हून अधिक युनिट्स विकले आहेत. कंपनीने ही कार भारतात जानेवारी 2023 मध्ये लाँच केली होती. ही कार सिंगल टॉप स्पेसिफिकेशन्स व्हेरिएंटमध्ये भारतात उपलब्ध आहे आणि तिची किंमत 45.95 लाख रुपये आहे.

Hyundai IONIQ 5 ची रेंज

कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, ही कार सिंगल चार्जवर 631 किलोमीटरची रेंज देते. ही रेंज ARAI नुसार आहे. या कारला 2022 चा कार ऑफ द इयर पुरस्कार देखील मिळाला आहे. याशिवाय याला वर्ल्ड कार डिझाईन ऑफ द इयर आणि वर्ल्ड इलेक्ट्रिक व्हेईकल ऑफ द इयरचा किताबही मिळाला आहे.

या इलेक्ट्रिक कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या कारमध्ये 72.6 kwh लिक्विड कूल्ड लिथियम आयन बॅटरी आहे. ही बॅटरी 160 kW ची कमाल पॉवर आणि 350 nM कमाल टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये सिंगल स्पीड रिडक्शन गिअर आहे.

कंपनीच्या वेबसाइटनुसार, या कारची किंमत 45.95 लाख रुपये आहे आणि ही कार भारतात सिंगल टॉप व्हेरिएंटमध्येही विकली जाते. सुरक्षेच्या दृष्टीने या कारमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. कारमध्ये 6 एअरबॅग उपलब्ध आहेत. याशिवाय इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल नियंत्रण आणि व्हेइकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट उपलब्ध आहे.

हेही वाचा – थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय? त्याचा लाभ कोणाला होतो?

याशिवाय, कारमध्ये हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल, पार्किंग असिस्ट, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ISOFIX यासह अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय कारमध्ये Hyundai Smartsense ADAS उपलब्ध आहे.

Leave a Comment