
अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा समारंभाच्या निमित्ताने, जगातील सर्वात मोठ्या हेल्मेट उत्पादकांपैकी एक असलेल्या स्टीलबर्ड हायटेक इंडिया लिमिटेडने “जय श्री राम” एडिशन SBH-34 हेल्मेट (Jai Shree Ram Edition Steelbird Helmet) बाजारात लाँच केले. हे स्पेशल एडिशन हेल्मेट या कार्यक्रमाच्या सांस्कृतिक महत्त्वासाठी असून ते अध्यात्माचे अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मिश्रण करते.
हे हेल्मेट Glossy Black with Bold Saffron आणि Glossy Orange with Black Details या दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. या विशेष हेल्मेटमध्ये अयोध्येतील भगवान श्री राम आणि श्री राम मंदिराच्या भव्य प्रतिमा आहेत. हे विशेषतः हेल्मेटच्या वरच्या बाजूला अतिशय बारीक कोरलेले आहेत.
हेही वाचा – Rolls Royce Specter भारतात लाँच, देशातील सर्वात महागडी इलेक्ट्रिक गाडी!
SBH-34 जय श्री राम एडिशन हेल्मेट मध्यम (580 मिमी) आणि मोठ्या (600 मिमी) आकारात उपलब्ध आहे. या हेल्मेट्समध्ये रायडर्सची विस्तृत श्रेणी सामावून घेता येते आणि वेगवेगळ्या आकाराचे हेड या हेल्मेटमध्ये उत्तम प्रकारे बसतात. स्टीलबर्डच्या या नवीन हेल्मेट श्रेणीची किंमत 1,349 रुपयांपासून सुरू होते.