
टाटा मोटर्स यंदा बऱ्याच गाड्या लाँच करण्याच्या तयारीत आहे. ज्याची सुरुवात जानेवारीमध्ये पंच EV पासून होईल, त्यानंतर टाटा या वर्षाच्या अखेरीस इलेक्ट्रिक हॅरियर लाँच करेल. टाटासाठी सर्वात मोठे लाँच कर्व्ह आहे. या गाडीचे 2023 ऑटो एक्सपोमध्ये सार्वजनिक प्रदर्शन करण्यापूर्वी 2022 मध्ये पहिल्यांदा अनावरण करण्यात आले होते. टाटा मोटर्सने नुकत्याच संपन्न झालेल्या इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024 मध्ये कर्व्ह गाडीचा प्रोटोटाइप प्रदर्शित केला. आता कर्व्ह (Tata Curvv EV ) एक चाचणीदरम्यान भारतीय रस्त्यांवर दिसली.
कर्व्ह प्रोटोटाइपच्या मागील फोटोंमध्ये त्याचा फ्रंट फॅसिआ दर्शविण्यात आला होता, जो मागील जनरेशनच्या टाटा कारच्या तुलनेत खूपच क्रांतिकारी आहे. शीर्षस्थानी स्लीक एलईडी स्ट्रिप आणि तळाशी त्रिकोणी क्लस्टर्समध्ये ड्युअल प्रोजेक्टर एलईडी हेडलॅम्पसह कर्व ब्रँडच्या नवीन डिझाइन व्हिजनवर आधारित आहे. साइड प्रोफाईलबद्दल सांगायचे तर, यात मस्क्यूलर व्हील आर्क आणि स्लीक कनेक्टेड एलईडी टेल लॅम्प आहेत. इतर हायलाइट्समध्ये विस्तारित ट्रॅक, शार्क फिन अँटेना आणि एक प्रमुख बूटलिड स्पॉयलर समाविष्ट आहे.
कर्व्हच्या केबिन इंटीरियरमध्ये सर्व-काळ्या लेआउटसह नवीन थीम आहे. हायलाइट्समध्ये फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्ले, संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, टच पॅनेलसह टाटाचे नवीन टू-स्पोक स्टीयरिंग व्हील आणि टच-आधारित HVAC नियंत्रणे यांचा समावेश आहे. इतर उल्लेखनीय फीचर्समध्ये डेडिकेटेड ORVM, पुश-बटण स्टार्ट, वायरलेस स्मार्टफोन चार्जिंग आणि पॅनोरॅमिक सनरूफ यांचा समावेश अपेक्षित आहे.
हेही वाचा – Ertiga ठरली देशातील सर्वात तेजीत विकली जाणारी MPV!
नेक्सॉन आणि पंचप्रमाणे, कर्व्ह देखील ICE आणि फुल-इलेक्ट्रिक डेरिव्हेटिव्ह दोन्हीमध्ये उपलब्ध असेल. कर्व्हच्या EV व्हेरिएंटमध्ये सिंगल आणि ड्युअल-मोटर दोन्ही सेटअप मिळण्याची अपेक्षा आहे. पहिल्याला फ्रंट-व्हील ड्राइव्ह लेआउट मिळेल तर नंतरचे ऑल-व्हील ड्राइव्ह कॉन्फिगरेशन मिळेल. दोन्हीमध्ये, एका चार्जवर रेंज सुमारे 400-500 किमी असेल.