महिंद्रा थारचे Earth एडिशन लाँच..! किंमत ₹15.40 लाखांपासून सुरू

WhatsApp Group

Mahindra Thar Earth Edition Launched | आता तुम्हाला ऑफ-रोडिंगसाठी प्रसिद्ध असलेली थार आता नव्या अवतारात पाहायला मिळणार आहे. देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या शक्तिशाली आणि लोकप्रिय एसयूव्ही थारचे नवीन व्हर्जन लाँच केले आहे. कंपनीने थारची अर्थ एडिशन बाजारात आणली आहे. हे व्हर्जन तुम्हाला वाळवंटाची अनुभूती देणार आहे. कंपनीने या नवीन थारमध्ये काही कॉस्मेटिक बदल केले आहेत. कंपनीने ही कार 2 इंजिन व्हेरिेएंटमध्ये उपलब्ध केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्याय मिळतील.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही कार थारच्या वाळवंटापासून प्रेरित आहे. ही कार महिंद्राचा थार वारसा पुढे नेणार असून त्याच प्लॅटफॉर्मवर ती तयार करण्यात आली आहे. कंपनीने नवीन थारमध्ये डेझर्ट फ्युरी फिनिश दिले आहे. कंपनीने ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशनसह कार लाँच केली आहे. याशिवाय ही कार 4X4 अनुभव देईल. कंपनी हे फीचर LX हार्ड टॉप व्हेरिएंटमध्ये देईल.

कंपनीने कारला डेझर्ट फ्युरी कलरचा अनुभव दिला आहे. एक्सटीरियरबद्दल बोलायचे झाले, तर कारला सिल्व्हर अलॉय व्हील आणि मॅट ब्लॅक बेझल्स मिळतात. कारच्या बाहेर अर्थ बॅजिंगही देण्यात आले आहे. याशिवाय कंपनीने इंटीरियरमध्ये काही खास बदलही केले आहेत.

हेही वाचा – ‘ही’ लक्झरी कार घेणारा अजिंक्य रहाणे ठरला पहिला भारतीय क्रिकेटर!

इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर फिकट रंगाच्या काळ्या आणि बेज रंगाच्या सीट देण्यात आल्या आहेत. कंपनीने कारमध्ये लेदरेट सीट्स दिल्या आहेत. केबिनमध्ये डेझर्ट फ्युरी फिनिशही देण्यात आले आहे. डेझर्ट फ्युरी फिनिश एसी व्हेंट्स, स्टिअरिंग व्हील, सेंटर कन्सोलवर उपलब्ध आहे.

हा नवीन थार 2 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध

कंपनीने ही कार 2 इंजिन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल व्हेरिएंटमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनची किंमत 15.40 लाख रुपये आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत 16.99 लाख रुपये आहे. याशिवाय डिझेल व्हेरिएंटमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनची किंमत 16.15 लाख रुपये आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची किंमत 17.60 लाख रुपये आहे.

Leave a Comment