
Toyota Fortuner Mild Hybrid Revealed : भारतीय बाजारपेठेतील फुल-साईज एसयूव्ही सेगमेंटमधील टोयोटा फॉर्च्युनरचे स्टेटस हे इतर कंपन्यांसाठी एक उदाहरणच आहे. मस्क्यूलर लुक आणि पॉवरफुल इंजिनसह येणारी, ही गाडी एसयूव्ही सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे. पण प्रचंड आकारमानामुळे आणि जड इंजिनमुळे लोक टोयोटा फॉर्च्युनरच्या मायलेजबद्दल चिंता व्यक्त करतात. पण आता यावरही उपाय सापडला आहे. जपानी कार उत्पादक टोयोटाने नवीन माइल्ड-हायब्रीड तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली नवीन फॉर्च्युनर लाँच केली आहे.
कंपनीने दक्षिण आफ्रिकेच्या बाजारात हे नवीन टोयोटा फॉर्च्युनर माइल्ड-हायब्रीड व्हेरिएंट लाँच केले आहे. हेच तंत्रज्ञान फॉर्च्युनर MHEV मध्ये वापरले गेले आहे जे Hilux च्या हायब्रीड व्हेरिएंटमध्ये दिसते. असे मानले जात आहे की कंपनी इतर मार्केटमध्ये देखील लाँच करेल. फॉर्च्युनर भारतात खूप प्रसिद्ध आहे आणि तिची लोकप्रियता लक्षात घेता, त्याचे हायब्रीड व्हेरिएंट इथेही लाँच केले जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
लुक आणि डिझाईनच्या बाबतीत ही नवीन एसयूव्ही हुबेहुब रेग्युलर मॉडेलसारखी आहे. बऱ्याच प्रमाणात, ती भारतीय बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या फॉर्च्युनर लिजेंडरसारखे दिसते. दक्षिण आफ्रिकेत कंपनीने गाडी अनेक रंगांमध्ये लाँच केली आहे, परंतु भारतीय बाजारपेठेत फॉर्च्युनर लिजेंडरफक्त ड्युअल-टोन, काळ्या आणि पांढऱ्या रंगात मिळते.
पॉवर आणि मायलेज
कंपनीने फॉर्च्युनर MHEV मध्ये पारंपारिक 2.8 लिटर क्षमतेचे डिझेल इंजिन देखील दिले आहे जे 48V माइल्ड-हायब्रीड प्रणालीशी जोडलेले आहे. ही हायब्रिड प्रणाली इंजिनला 16hp ची अतिरिक्त शक्ती आणि 42Nm टॉर्क प्रदान करते. एकत्रितपणे, हे इंजिन 201hp पॉवर आणि 500Nm टॉर्क जनरेट करतात. टोयोटाचे म्हणणे आहे की हे हायब्रीड फॉर्च्युनर नियमित 2.8 लिटर डिझेल इंजिन व्हेरिएंटपेक्षा सुमारे 5% अधिक मायलेज देते.
हेही वाचा – नवीन इलेक्ट्रिक रिक्षा लाँच! फक्त 15 मिनिटांत फुल चार्ज, किंमत ‘इतकी’
ही गाडी टू-व्हील ड्राइव्ह (2WD) आणि चार-चाकी ड्राइव्ह (4WD) दोन्ही व्हेरिेएंटमध्ये लाँच केली गेली आहे. कंपनीचा दावा आहे की, आयडियल स्टार्ट-स्टॉप तंत्रज्ञानामुळे, हायब्रिड फॉर्च्युनर स्मूद थ्रोटल प्रतिसाद देते. याशिवाय ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS) देखील त्यात जोडण्यात आली आहे, जी 360-डिग्री कॅमेरासह येते.