नवीन Maruti Suzuki Swift 2024 किती मायलेज देईल? लाँचपूर्वी लीक झाली माहिती!

WhatsApp Group

Maruti Suzuki Swift 2024 : मारुती सुझुकीने नवीन 2024 स्विफ्टसाठी बुकिंग घेणे सुरू केले आहे. ही स्विफ्ट 9 मे रोजी लाँच केली जाऊ शकते. पण, लाँच होण्याआधीच कारच्या इंजिन स्पेसिफिकेशन्स आणि इंधन कार्यक्षमतेची माहिती लीक झाली आहे. मात्र, या संदर्भात मारुती सुझुकीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही किंवा लीक झालेल्या माहितीची पुष्टीही झालेली नाही.

गेल्या वर्षी, टोकियो मोबिलिटी शोमध्ये चौथ्या पिढीतील स्विफ्टचे अनावरण करण्यात आले, ज्यामध्ये अपडेटेड 1.2-लिटर 4-सिलेंडर पेट्रोल इंजिनच्या जागी नवीन 1.2-लीटर 3-सिलेंडर इंजिन दिसले. हे सूचित करते की नवीन Z सीरिज 1.2-लिटर 3-सिलेंडर इंजिन नवीन स्विफ्टसह भारतात येईल.

लीक झालेल्या माहितीवर आधारित वृत्तानुसार, नवीन 1.2-लीटर इंजिन माइल्ड हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. स्विफ्ट हे फीचर मिळवणारी पहिली हॅचबॅक असेल. रिपोर्टनुसार, 2024 स्विफ्ट 25.72 किमी/लीटरचे मायलेज देईल परंतु हे मायलेज मॅन्युअल की ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे आहे याची पुष्टी झालेली नाही.

हेही वाचा – खूप दूर रोड ट्रिपला जात आहात? आधी कारमधील ‘या’ गोष्टी तपासा!

स्विफ्टचे आंतरराष्ट्रीय मॉडेल सीव्हीटीने सुसज्ज असले तरी भारतीय बाजारपेठेत याला जुन्या मॉडेलप्रमाणे एएमटी मिळणे अपेक्षित आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, नवीन स्विफ्ट 3 किमी/लिटर अधिक मायलेज देईल (सध्याच्या मॉडेलपेक्षा), म्हणजेच ती अधिक इंधन कार्यक्षम आहे.

नवीन 1.2-लिटर 3-सिलेंडर इंजिन 81bhp पॉवर आणि 112Nm टॉर्क जनरेट करू शकते. त्याच वेळी, जुने 1.2-लिटर 4-सिलेंडर इंजिन 89bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. म्हणजेच, नवीन स्विफ्टला 8bhp कमी पॉवर आणि 1Nm कमी टॉर्क मिळू शकतो.

मात्र, इंजिन किंवा कारशी संबंधित कोणतीही माहिती मारुती सुझुकीने दिल्यावरच खात्री केली जाईल. हे या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात (एप्रिल 2024) लाँच होणार आहे. त्यासाठी तयारी सुरू आहे.

Leave a Comment