Bajaj ने लाँच केली जगातील पहिली CNG बाईक, फुल टाकीत देईल 330 किमीचं मायलेज!

WhatsApp Group

Bajaj CNG Bike Freedom 125 : बजाजने जगातील पहिली CNG बाईक Freedom 125 भारतात लाँच केली आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत 95,000 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. कंपनीने ही बाईक डिस्क एलईडी, ड्रम एलईडी आणि ड्रम या तीन व्हेरिएंटमध्ये सादर केले आहे. या बाईकच्या ड्रम व्हेरिएंटची किंमत 95,000 रुपये, ड्रम एलईडीची किंमत 1,05,000 रुपये आणि डिस्क एलईडीची किंमत 1,10,000 रुपये आहे. सर्व किंमती एक्स-शोरूमनुसार आहेत.

फ्रीडम १२५ सीएनजी बाइकमध्ये एलईडी हेडलाइट, मोनोशॉक रिअर सस्पेन्शन, एलईडी हेडलाइट आणि फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. कंपनीने बाइकला एक मजबूत डिझाइन दिले आहे ज्याला अनेक प्रकारच्या क्रॅश चाचण्यांद्वारे प्रमाणित केले गेले आहे. या बाईकमध्ये 2 किलो वजनाची CNG टाकी आणि 2 लीटरची पेट्रोल टाकी बसवण्यात आली आहे.

इंजिन आणि पॉवर

कंपनीने या बाईकमध्ये 125cc ड्युअल फ्युएल इंजिन बसवले आहे जे 9.5PS पॉवर आणि 9.7 Nm टॉर्क जनरेट करते. बाईकमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स आहे.

मायलेज

Freedom 125 मध्ये 2 लीटरची CNG टाकी आणि 2 लीटरची पेट्रोल टाकी बसवण्यात आली आहे. बाईकमधील इंधन निवडण्यासाठी हँडलवर एक स्विच देखील दिलेला आहे. ही बाईक चालवणे किफायतशीर ठरणार आहे. कंपनीने दावा केला आहे की ही बाईक 330 किलोमीटरची संपूर्ण टँक रेंज देऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी लवकरच बाईकची डिलिव्हरी सुरू करू शकते.

Leave a Comment