फक्त ₹50,000 मध्ये मिळतेय OLA ची इलेक्ट्रिक स्कूटर! एकदा पाहाच ही ऑफर

WhatsApp Group

Ola S1 Electric Scooter Offer : देशातील आघाडीची ईव्ही कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकला सध्या ग्राहकांच्या तक्रारींचा सामना करावा लागत आहे. आता कंपनीने फेस्टिव्ह सीझन कॅश करण्यासाठी फेस्टिव्ह सीझन ऑफर आणली आहे. ओला इलेक्ट्रिकने ‘BOSS 72-hour Rush’ ची घोषणा केली आहे. ही ऑफर आजपासून म्हणजेच 10 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून तुम्ही 12 ऑक्टोबरपर्यंत या ऑफरचा लाभ घेऊ शकता. कंपनीने या ऑफरअंतर्गत 25,000 रुपयांची सूट आणि 5,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक जाहीर केला आहे. या ऑफरनंतर, जर तुम्हाला ओला इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची असेल तर त्याची किमान किंमत 50000 रुपये असेल, जी आजपर्यंतची सर्वात कमी किंमत आहे.

सणासुदीच्या काळात अधिक विक्रीसाठी आणि ग्राहकांना सणासुदीची भेट म्हणून कंपनीने ही ऑफर जाहीर केली आहे. कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर OLA S1 ची किंमत ही स्कूटर आता 49,999 रुपयांना खरेदी करता येईल. मात्र, ही ऑफर मर्यादित काळासाठीच वैध आहे.

हेही वाचा – BYD eMax 7 भारतात लाँच! सुरुवातीची किंमत ₹26.90 लाख; वाचा डिटेल्स

कंपनीने सांगितले की जर कोणाला ओलाची फ्लॅगशिप स्कूटर OLA S1 Pro खरेदी करायची असेल तर कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरवर 25,000 रुपयांची सूट देत आहे. याशिवाय, जर एक्सचेंज करायचे असेल तर त्यावर 5000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे.

ऑफर

Ola S1 X 2kWh फक्त 50,000 रुपयांना खरेदी करा.
OLA S1 Pro पोर्टफोलिओवर 25000 रुपयांची सूट.
OLA S1 Pro वर 5000 रुपयांचा एक्सचेंज बोनस.
मोफत 8 वर्षे किंवा 80,000 किमी बॅटरीची वॉरंटी 7000 रुपये.
निवडक क्रेडिट कार्डच्या EMI वर रु. 5000 पर्यंत फायनान्स ऑफर.
7000 रुपयांचे मोफत चार्जिंग क्रेडिट, 6000 रुपयांचे मोफत MoveOS+ अपग्रेड.

Leave a Comment