Honda CB300F : होंडाने लाँच केली देशातील पहिली 300 सीसी Flex-Fuel बाईक! किंमत ‘इतकी’

WhatsApp Group

Honda CB300F Flex Fuel Bike : होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने (HMSI) अधिकृतपणे नवीन CB300F फ्लेक्स-फ्युल बाईक लाँच केली आहे, जी भारतातील पहिली 300 cc फ्लेक्स-फ्युल बाईक आहे. या बाईकच्या लाँचसोबतच कंपनीने तिचे अधिकृत बुकिंगही सुरू केले आहे. खरेदीदार आता होंडाच्या Bigwing डीलरशिपवर ही बाईक बुक करू शकतात आणि त्याची किंमत 1.70 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

कंपनीने गेल्या भारत मोबिलिटी शोमध्ये प्रथमच ही फ्लेक्स-फ्युल बाईक शोकेस केली होती. ही बाईक E85 इंधनावर चालेल. म्हणजेच त्यात वापरण्यात येणारे इंधन 85 टक्के इथेनॉल आणि 15 टक्के पेट्रोल असेल. फ्लेक्स-फ्युल इंजिन व्यतिरिक्त कंपनीने या बाईकमध्ये कोणताही बदल केलेला नाही. या बाईकचा लुक, डिझाइन आणि हार्डवेअर इ. पूर्वीप्रमाणेच आहे.

ही बाईक मोठ्या प्रमाणात स्टँडर्ड मॉडेलसारखीच आहे. एलईडी हेडलाइट्स आणि मस्क्युलर बॉडी वर्क यात पाहायला मिळत आहे. त्याचा फ्रंट थोडा अधिक शार्प करण्यात आला आहे, ज्यामुळे त्याला स्पोर्टी अपील मिळते. ही बाईक दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आली आहे. ज्यामध्ये लाल आणि राखाडी रंगांचा समावेश आहे. त्याच्या डिस्प्लेमध्ये इथेनॉल इंडिकेटरही देण्यात आला आहे.

पॉवर आणि परफॉरमन्स

कंपनीने या बाईकमध्ये 293.5 सीसी क्षमतेचे सिंगल-सिलेंडर ऑइल कूल्ड इंजिन वापरले आहे. जे 24.5bhp पॉवर आणि 25.9Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या बाईकमध्ये LED इल्युमिनेशनसह पूर्वीप्रमाणेच डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे.

हार्डवेअरबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने CB300F मध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि ट्रॅक्शन कंट्रोल सारखी फीचर्स समाविष्ट केली आहेत. त्याच्या समोर एक सोनेरी रंगाचे अप-साइड-डाउन (USD) फोर्क सस्पेंशन आहे. मोनोशॉक सस्पेन्शन मागील बाजूस उपलब्ध आहे. या बाइकच्या दोन्ही चाकांमध्ये सिंगल डिस्क ब्रेक उपलब्ध आहे.

Leave a Comment