Honda Activa Electric : इलेक्ट्रिक होंडा अक्टिवा भारतात लाँच होतेय!

WhatsApp Group

Honda Activa Electric : होंडा अॅक्टिवा बुक करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक अपडेटेड बातमी आहे. होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया लवकरच त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर होंडा अॅक्टिवा ई (Honda Activa E) लाँच करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 27 नोव्हेंबरला ही गाडी सर्वांसमोर येऊ शकते. कंपनीची ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक स्कुटी असेल. मिळालेल्या माहितीनुसार, ही स्कुटी चांगल्या रेंजसह बाजारात लाँच केली जाऊ शकते.

अॅक्टिवा ई लाँच दोन प्रकारांमध्ये येऊ शकते. यापैकी, एंट्री-लेव्हल व्हेरिएंटमध्ये बेसिक TFT डिस्प्ले असेल, तर हाय-एंड व्हेरिएंट ग्राहकांना बहु-रंगीत डिस्प्ले देऊ शकतो. प्रीमियम व्हेरिएंटचा डिस्प्ले बॅटरी चार्ज, उर्वरित बॅटरी रेंज, स्पीड आणि राइड मोडसह महत्त्वाची माहिती देईल. याशिवाय, यात टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि म्युझिक कंट्रोल यांसारख्या फीचर्ससह सुसज्ज असेल.

परफॉरमन्सच्या बाबतीत, ही इलेक्ट्रिक स्कुटी मानक मोडमध्ये पूर्ण चार्जिंगसह 104 किलोमीटरची रेंज देईल. अॅक्टिवा ईमध्ये स्पोर्ट मोड देखील समाविष्ट असेल, जो कमी रेंजच्या परिस्थितीत उच्च थ्रॉटल प्रतिसाद देईल. पॉवरट्रेन तपशीलांबद्दल बोलायचे झाल्यास, स्कूटरला बजाज चेतक आणि विडा V1 सारख्या प्रतिस्पर्ध्यांप्रमाणे स्विंगआर्म-माउंट मोटर दिली जाऊ शकते.

टीझरमध्ये डिझाइनची झलक सामान्य फीचर्स आणि एक आकर्षक एलईडी हेडलॅम्प दर्शवते. सध्या किंमतीबाबत कोणताही अंदाज बांधणे योग्य नाही. अशा स्थितीत, असे मानले जात आहे की कंपनी बाजारात सध्या असलेल्या आपल्या स्पर्धकांच्या किमतीच्या जवळपास किंमतीत लाँच करू शकते.

Leave a Comment