Brezza, Sonet, Nexon या गाड्यांची बॅँड वाजणार, सुरू झालीय Skoda Kylaq ची बुकिंग!

WhatsApp Group

Skoda Kylaq Booking Open : आता SUV मार्केटमध्ये प्रचंड खळबळ उडणार आहे, कारण मारुती ब्रेझा, ह्युंदाई वेन्यू, किआ सोनेट आणि टाटा नेक्सॉन यांच्याशी स्पर्धा करणाऱ्या स्कोडा कायलाकचे बुकिंग आजपासून सुरू झाले आहे. कंपनीने त्याची सुरुवातीची किंमत आधीच जाहीर केली होती, आता त्याच्या इंट्रोडक्टरी ऑफर आणि व्हेरिएंटची किंमत देखील समोर आली आहे.

कंपनीने स्कोडा कायलाक ही सब-कॉम्पॅक्ट SUV म्हणून सादर केली आहे. एवढेच नाही तर कंपनीने एंट्री लेव्हल एसयूव्ही सेगमेंटमध्येही प्रवेश केला आहे. कंपनीने सोमवारपासूनच बुकिंग सुरू केले आहे, तर त्याची डिलिव्हरी 27 जानेवारीपासून सुरू होईल.

कंपनीने स्कोडा कायलाक 4 व्हेरिएंटमध्ये सादर केली आहे. यातील बेस व्हर्जनचे नाव क्लासिक आहे. कंपनीने स्कोडा कायलाकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7.89 लाख रुपये ठेवली आहे. ही त्याच्या क्लासिक व्हेरिएंटची (स्कोडा क्लासिक) किंमत आहे.

याशिवाय, सिग्नेचर मॅन्युअल ट्रान्समिशन (सिग्नेचर एमटी) ची किंमत 9.59 लाख रुपये आणि सिग्नेचर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (सिग्नेचर एटी) ची किंमत 10.59 लाख रुपये आहे.

स्कोडा कायलाकच्या सिग्नेचर प्लस मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरिएंटची (सिग्नेचर प्लस एमटी) किंमत 11.40 लाख रुपये आहे आणि सिग्नेचर प्लस ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (सिग्नेचर प्लस एटी) ची किंमत 12.40 लाख रुपये आहे.

तर प्रेस्टीज मॅन्युअल ट्रान्समिशन (प्रेस्टीज एमटी) च्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 13.35 लाख रुपये आणि प्रेस्टीज ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची (प्रेस्टीज एटी) किंमत 14.40 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा – Loud Music In Car : मोठमोठ्याने संगीत वाजवून गाडी चालवाल तर दंड लागेल का? जाणून घ्या

स्कोडा कायलाकचे बुकिंग सुरु करण्यासोबतच कंपनीने एक ऑफर देखील आणली आहे. सर्वप्रथम, कंपनी 33,333 खरेदीदारांना 3 वर्षांचे स्टँडर्ड मेंटेनेंस पॅकेज मोफत देईल. सध्या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हींना बाजारात सर्वाधिक मागणी आहे.

स्कोडा कायलाक फीचर्सनी परिपूर्ण

जर आपण स्कोडा कायलाकच्या फीचर्सबद्दल बोललो, तर ती 4 मीटरपेक्षा कमी एसयूव्ही श्रेणीतील कार आहे. त्याचा ग्राऊंड क्लीयरन्स 189 मिमी आहे. यामध्ये तुम्हाला 8 इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले मिळेल. 10 इंच इन्फोटेनमेंट टच स्क्रीन उपलब्ध आहे. कनेक्टेड कार तंत्रज्ञानाव्यतिरिक्त हवेशीर आणि पॉवर फ्रंट सीट, सिंगल पेन सनरूफ, ॲम्बियंस लाइटिंग, 6 स्पीकर यांसारखी अनेक फीचर्स उपलब्ध आहेत.

सुरक्षेच्या पातळीवर, यात 6 एअरबॅग्ज, ट्रॅक्शन कंट्रोल, प्रत्येक प्रवाशासाठी 3-पॉइंट सीट बेल्ट, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, सेन्सर्स आणि ABS यांसारखी इतर अनेक फीचर्स आहेत.

Leave a Comment