मारुती डिझायरला टक्कर द्यायला आली Honda Amaze Facelift! किंमत 8 लाखांपासून सुरू, दिलंय ADAS फीचर

WhatsApp Group

New Honda Amaze Facelift : भारतात सर्व कार कंपन्या एकापाठोपाठ एक नवीन एसयूव्ही मॉडेल्स लाँच करत आहेत. शिवाय कॉम्पॅक्ट सेडान श्रेणीची एकामागू एक रांग लागत आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, होंडा कार्स इंडियाने नवीन होंडा अमेझचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केले. कंपनीने त्याच्या डिझाईनसह अनेक फीचर्स अपग्रेड केले आहेत. बाजारात त्याची थेट स्पर्धा नवीन मारुती डिझायरशी होणार आहे.

होंडा अमेझ आणि मारुती डिझायर या दोन्ही देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सेडान कार आहेत. मारुतीने काही काळापूर्वी डिझायरचे नवीनतम मॉडेल लाँच केले होते. त्यांची ही कार पहिली 5-स्टार सेफ्टी रेटिंग कार आहे. या दोन कारमध्ये किंमत युद्ध सुरू होणार आहे. होंडा अमेझचे बुकिंग सुरु आहे, आजपासून टेस्ट ड्राइव्ह घेता येईल आणि त्याची डिलिव्हरी पुढील महिन्यापासून सुरू होईल.

कंपनीने नवीन होंडा अमेझमध्ये Advanced Driver Assistant System (ADAS) दिली आहे, जी या सेगमेंटमधील कारमध्ये प्रथमच प्रदान करण्यात आली आहे. ADAS कारची सुरक्षितता मजबूत करण्यासाठी काम करते. होंडाची स्वतःची Honda Sensing ADAS कारमध्ये देण्यात आली आहे, जी होंडा सिटी आणि होंडा एलिव्हेटमध्ये दिसून आली आहे.

यामुळे कारला पुढील बाजूपासून मागच्या बाजूला कॅमेरे बसवण्यात आले आहेत. इतकंच नाही तर आता चालकाला गाडी चालवताना ब्लाइंड स्पॉट्सचा सामना करावा लागणार नाही. यासाठी साइड मिररसह कॅमेरा सेटअप करण्यात आला आहे. कारची ADAS प्रणाली ॲडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक ब्रेकिंग आणि लेन किप असिस्टची सुविधा देईल.

नवीन होंडा अमेझमध्ये, तुम्हाला 8-इंच इंफोटेनमेंट टचस्क्रीन सिस्टम, वायरलेस कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो स्टँडर्ड मिळेल. तर ADAS प्रणाली वरील 2 ट्रिममध्ये उपलब्ध असेल. यात ड्रायव्हरसाठी 7-इंच सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मागील एसी व्हेंट्स आणि प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी 2.5 हेपा फिल्टर देखील आहे.

हेही वाचा – Lectrix Nduro Electric Scooter : लाँच झाली ‘स्वस्त’ इलेक्ट्रिक स्कूटर! किंमत फक्त 60 हजार

नवीन होंडा अमेझला खूप बोल्ड इमेज देण्यात आली आहे. त्याची पुढची लोखंडी जाळी चौकोनी आकाराची आहे, जी मुख्यत्वे होंडा एलिव्हेटसारखी आहे. यात पुढच्या बाजूला एलईडी बाय-प्रोजेक्टर लेन्स हेडलॅम्प आणि मागील बाजूस एलईडी टेल लॅम्प आहेत, जे होंडा सिटीशी जुळतात. कारचा एकूण लुक षटकोनी आकारात असून गोल वक्रांपासून अंतर ठेवण्यात आले आहे. कंपनीने कारमध्ये 15 इंची अलॉय व्हील्स दिले आहेत. तर त्याची कलर थीम ड्युअल टोन आहे. यात 416 लीटरची बूट स्पेस आहे, जी पूर्वीपेक्षा जास्त आहे.

किंमत

होंडा अमेझची सुरुवातीची किंमत 7.99 लाख रुपये आहे. ही कार 3-ट्रिममध्ये येईल. स्टँडर्ड मॉडेल V आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत मॅन्युअलमध्ये 7.99 लाख रुपये आणि ऑटोमॅटिकमध्ये 9.20 लाख रुपये आहे. तर त्याच्या VX ट्रिमची किंमत मॅन्युअलमध्ये 9.10 लाख रुपये आणि ऑटोमॅटिकमध्ये 10 लाख रुपये आहे. तर ZX ट्रिमची किंमत मॅन्युअलमध्ये 9.70 लाख रुपये आणि ऑटोमॅटिकमध्ये 10.90 लाख रुपये आहे.

Leave a Comment