जबरदस्त फोल्डेबल ई-सायकल, आनंद महिंद्रांनीही केलीय गुंतवणूक!

WhatsApp Group

Anand mahindra E-Bike Hornback X1 : मोबिलिटीचे भविष्य म्हणून इलेक्ट्रिक गाड्यांचे वर्णन केले जाते. त्यामुळे आपला देश इलेक्ट्रिक गाड्यांकडेही खूप लक्ष देत आहे. इलेक्ट्रिक गाड्यांच्या क्षेत्रात अनेक नवीन स्टार्टअप्स येत आहेत आणि त्यांना चांगला निधीही मिळत आहे. अलीकडेच, महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी सोशल नेटवर्किंग साइट ‘X’ वर जगातील पहिल्या फोल्डेबल डायमंड इलेक्ट्रिक सायकलचे (ई-बाईक) फोटो शेअर केले. महिंद्रांनी या सायकलचे खूप कौतुक केले आणि त्यांनी या कंपनीत गुंतवणूक केली आहे.

आनंद महिंद्रा यांनी या इलेक्ट्रिक सायकलचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यांनी स्वतः ही सायकल चालवली, नंतर ती दुमडली आणि गाडीत टाकली. फोटोंसोबत आनंद महिंद्रा यांनी लिहिले, “आयआयटी बॉम्बेचा आम्हाला पुन्हा अभिमान वाटला आहे. त्यांनी पूर्ण आकाराच्या चाकांसह जगातील पहिली फोल्डेबल डायमंड फ्रेम ई-बाईक तयार केली आहे. ही बाईक इतर फोल्डेबल बाईक्सपेक्षा 35% अधिक कार्यक्षम आहे. उच्च आणि कमी वेगातही ती स्थिर राहते.”

हेही वाचा – गाड्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारचे मोठे पाऊल, आता तुमची कार…

त्यांनी ट्वीटमध्ये पुढे लिहिले की, “ही एकमेव अशी बाईक आहे जी फोल्ड केल्यानंतर उचलावी लागत नाही. मी माझी हॉर्नबॅक X1 ऑफिसच्या परिसरात घेतली आहे! (मी या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे.) “ही इलेक्ट्रिक सायकल ऑफ हॉर्नबॅक X1 ऍमेझॉन तसेच फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

या सायकलबाबत माहिती…

हॉर्नबॅक X1 ही डायमंड फ्रेम असलेली फोल्डेबल ई-बाईक आहे. ही 250W मोटर आणि 36V बॅटरीसह येते, जे एका पूर्ण चार्जवर 70 किलोमीटरपर्यंत चालू शकते. त्याचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास आहे. त्याचे वजन फक्त 15 किलो आहे. ही सायकल फोल्ड करणे देखील सोपे आहे. तुम्ही ते काही सेकंदात फोल्ड करू शकता.

Leave a Comment