Mahindra Bolero 2025 : “मैडम बैठ बोलेरो मैं…” हे गाणं आठवतंय का? ही केवळ ओळ नाही, तर बोलेरोच्या अफाट लोकप्रियतेचा एक पुरावा आहे. महिंद्राने आपल्या ‘रग्ड’ आणि विश्वासार्ह बोलेरो SUV ला 2025 साली आणखी अपडेट करून पुन्हा एकदा चर्चेत आणलं आहे. एवढंच नव्हे, तर बोलेरो निओचाही सुधारित अवतार सादर केला आहे.
महिंद्राची ही दोन्ही 7 सीटर SUV गाड्या आता नवीन डिझाईन, उत्तम फीचर्स आणि जबरदस्त इंजिनसह उपलब्ध आहेत. बोलेरोची एक्स-शोरूम किंमत ₹7.99 लाखांपासून सुरू होते, तर बोलेरो निओची सुरुवात ₹8.49 लाखांपासून होते.
The streets have a new Boss. Meet the New Bolero Neo
— Mahindra Bolero (@MahindraBolero) October 7, 2025
✅ Sleek new grille
✅ New R16 alloys
✅ Bold new colours
✅ RideFlo Technology
and more..
Priced at ₹ 8.49 – ₹ 9.99 Lakh*
*T&C apply pic.twitter.com/8D33IW7tnr
The Boss is here. Presenting the New Bolero, with a bold new grille, fog lamps diamond-cut alloys. Authentic toughness now comes with upgraded comfort and elegance. Priced at ₹ 7.99 – ₹ 9.69 Lakh. pic.twitter.com/32OvnfMq7H
— Mahindra Bolero (@MahindraBolero) October 7, 2025
इंजिन व परफॉर्मन्स
बोलेरो (Bolero 2025)
- 1.5 लीटर mHawk75 डिझेल इंजिन
- 75bhp पॉवर आणि 210Nm टॉर्क
- 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स
- रिअर व्हील ड्राइव्ह (RWD)
बोलेरो निओ (Bolero Neo 2025)
- 1.5 लीटर mHawk100 डिझेल इंजिन
- 100bhp पॉवर आणि 260Nm टॉर्क
- 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन
- रिअर व्हील ड्राइव्ह
- MTT (Multi Terrain Technology) आणि लॉकिंग डिफरेंशियल
महत्त्वाचं म्हणजे, दोन्ही मॉडेल्समध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची सुविधा सध्या दिलेली नाही.
किंमत आणि व्हेरिएंट्स
बोलेरो:
- 4 व्हेरिएंट
- ₹7.99 लाख (बेस) ते ₹9.69 लाख (टॉप) पर्यंत
बोलेरो निओ:
- 5 व्हेरिएंट
- ₹8.49 लाख (बेस) ते ₹9.99 लाख (टॉप)
एक्सटीरियर डिझाईन
बोलेरो:
- नवीन 5-स्लेट क्रोम ग्रिल
- हॅलोजन हेडलॅम्प व नवे फॉग लॅम्प
- 16 इंच अलॉय व्हील्स
बोलेरो निओ:
- नवीन हॉरिजोंटल स्लेट ग्रिल
- ड्युअल-टोन रूफ, डार्क ग्रे अलॉय व्हील्स
- फ्रंट बंपरवर सिल्व्हर फिनिश
- साइड हिंज्ड टेलगेट आणि स्पेअर व्हील कव्हर
फीचर्स – टेक्नोलॉजी आणि आराम
बोलेरो:
- 7-इंच टचस्क्रीन
- C-टाइप चार्जिंग पोर्ट
- सेमी-डिजिटल क्लस्टर
- पावर विंडो (मध्यभागी), मॅन्युअल AC
- स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ कंट्रोल
- लेदर सीट्स
बोलेरो निओ:
- 9-इंच टचस्क्रीन
- रिअर पार्किंग कॅमेरा
- ऑल-फोर पावर विंडो
- हाइट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट
- क्रूझ कंट्रोल, 6-स्पीकर साऊंड सिस्टम
- कलर्ड मल्टी-इंफॉर्मेशन डिस्प्ले
सेफ्टी फीचर्स
दोन्ही SUV मध्ये उपलब्ध:
- ड्युअल फ्रंट एअरबॅग्स
- रिअर पार्किंग कॅमेरा
- ISOFIX चाइल्ड सीट अँकर
- ABS + EBD
- पार्किंग सेंसर्स
रंग पर्याय
बोलेरो:
- स्टेल्थ ब्लॅक
- Dsat सिल्व्हर
- रॉकी बेज
बोलेरो निओ:
- कंक्रीट ग्रे
- जीन्स ब्लू
- (इंटीरियर रंग – मोका ब्राऊन / लुनार ग्रे)
स्पर्धा कोणाशी?
बोलेरो आणि बोलेरो निओ यांच्यात स्पर्धा नाही. दोन्ही SUV वेगळ्या प्रकारच्या ग्राहकांसाठी डिझाइन केल्या आहेत. खरं स्पर्धक आहेत – Maruti Brezza, Tata Nexon, Kia Sonet आणि Hyundai Venue