Maruti Suzuki Hyundai Cars Discount Diwali Offers 2024 : या दिवाळीनिमित्त मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि महिंद्रासारख्या ऑटो कंपन्या नवीन कार खरेदीवर लाखो रुपयांची सूट देत आहेत. मारुती, महिंद्रा आणि ह्युंदाईचे कोणते मॉडेल स्वस्तात मिळतील ते जाणून घ्या.
महिंद्रा कार सवलत
महिंद्रा थार 4×4 1.25 लाख रुपयांपर्यंत रोख सवलत आणि 25 हजार रुपयांच्या मोफत ॲक्सेसरीजसह उपलब्ध आहे. त्याचवेळी बोलेरो निओवर 70 हजार रुपयांपर्यंत रोख सवलत, 30 हजार रुपयांपर्यंतच्या मोफत ॲक्सेसरीज आणि 20 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे. महिंद्राची इलेक्ट्रिक कार XUV400 च्या EL Pro FC व्हेरिएंटवर 3 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.
ह्युंदाई कार सवलत
ह्युंदाईच्या लोकप्रिय हॅचबॅक Grand i10 Nios वर 45 हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. याशिवाय एक्सचेंज आणि कॉर्पोरेट डिस्काउंटचे फायदेही दिले जात आहेत. व्हेन्यू 1.2 च्या काही व्हेरिएंटवर 50,000 रुपयांपर्यंत सूट आणि 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. याशिवाय व्हेरिएंट अल्काझार फेसलिफ्टवर 55 हजार रुपयांपर्यंत रोख आणि 30 हजार रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंट देखील उपलब्ध आहे.
हेही वाचा – हेल्मेट बनवणाऱ्या 162 कंपन्यांवर बंदी, केंद्र सरकारचा ‘कडक’ निर्णय!
मारुती सुझुकी कार सवलत
मारुती जिमनीच्या Zeta व्हेरिएंटवर 1.75 लाख रुपयांपर्यंत आणि अल्फा व्हेरिएंटवर 2.30 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. त्याचवेळी, ब्रेझ्झा अर्बनो एडिशनच्या LXI प्रकारावर 27 हजार रुपयांपर्यंत रोख सवलत दिली जात आहे आणि VXI प्रकारावर 15 हजार रुपयांपर्यंत रोख सवलत दिली जात आहे. याशिवाय या वाहनांवर 15 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळणार आहे. हायब्रीड तंत्रज्ञानासह येणाऱ्या ग्रँड विटारा स्ट्राँग हायब्रिड मॉडेलवर 50,000 रुपयांपर्यंत रोख आणि 50,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे.
मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि महिंद्रा कंपन्यांच्या या गाड्यांवर ही दिवाळी ऑफर कधी उपलब्ध होईल हे माहीत नाही. या मॉडेल्सवरील ऑफरचा लाभ 31 ऑक्टोबरपर्यंत मिळणे अपेक्षित आहे, त्यामुळे ऑफर संपण्यापूर्वी संधीचा लाभ घ्या.