Mika Singh चं ‘सोनेरी Hummer स्वप्न’ साकार! नवीन SUV पाहून चाहत्यांचे डोळे थक्क, राजेशाही थाटच!

WhatsApp Group

Mika Singh New Hummer SUV : पंजाबी गायक मीका सिंग (Mika Singh) हा त्याच्या दमदार गाण्यांबरोबरच अनोख्या कार कलेक्शनसाठी प्रसिद्ध आहे. आता त्याने आपल्या गॅरेजमध्ये आणखी एक जबरदस्त गाडीची भर घातली आहे. त्याने नुकतीच एक कस्टमाईज्ड Hummer H2 SUV विकत घेतली असून तिचा लुक पाहून चाहत्यांचे डोळे थक्क झाले आहेत.

ही माहिती दलैर मेहंदींचे सुपुत्र गुरदीप मेहंदी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये मीका, गुरदीप आणि नवराज हंस हे तिघेही SUV जवळ उभे राहून पोज देताना दिसत आहेत.

Hummer H2 SUV – लक्झरीचा दुसरा अर्थच!

मीकाची ही नवीन Hummer H2 ही सामान्य मॉडेलपेक्षा अधिक लक्झरी आणि कस्टमाईज्ड आहे. तिचा बेसिक रंग काळा असला तरी संपूर्ण गाडीवर सोन्याची झळाळी देणारी गोल्ड डिटेलिंग करण्यात आली आहे. हुड, फ्रंट बंपर, व्हील्स, डोअर हँडल्स, फ्युएल लिड आणि साइड मिरर माउंट्स या सर्व ठिकाणी सोन्याची झाक दिसून येते.

मीकाची जुनी गाडीही होती चर्चेत

मीका सिंगने 2006 सालीच पहिली Hummer H2 खरेदी केली होती, जी त्या वेळी ऑरेंज कलरमध्ये होती. त्यात 6.2L L9H V8 पेट्रोल इंजिन बसवले होते. ती गाडी 2011 मध्ये एका हिट-अँड-रन घटनेमुळे चर्चेत आली होती, तर 2021 मध्ये जोरदार पावसात ती बंद पडली होती.

हेही वाचा – दिवाळी धमाका! बलेनोपासून टियागोपर्यंत सर्वाधिक सूट, कोणती कार घेतल्यावर मिळणार 1 लाख रुपयांपर्यंत फायदा?

Hummer H2 ची फीचर्स (Specifications):

  • इंजन: GM चे 6.0-लीटर किंवा 6.2-लीटर V8 (मॉडेल वर्षावर अवलंबून)
  • ड्राइवट्रेन: फुल-टाइम 4×4, रियर डिफरेंशियल लॉकिंग, ड्राइवलाइन कंट्रोल
  • इंटीरियर: प्रीमियम लेदर सीट्स, हीटेड सीटिंग, DVD नेव्हिगेशन सिस्टम
  • एक्सटीरियर: मिलिटरी-स्टाइल डिझाईन, रिइनफोर्स्ड स्किड प्लेट्स, टो हुक्स, ऑल-टेरेन टायर्स
  • कार्गो: SUT मॉडेलमध्ये मिडगेट फीचर, ज्यामुळे आतील जागा व कार्गो एकत्र जोडली जाते

Status Symbol म्हणून ओळखली जाणारी SUV

Hummer H2 ही केवळ एक SUV नसून, ती लक्झरी आणि पॉवरचा संगम आहे. तिचं रग्ड लुक, दमदार ऑफ-रोड क्षमता आणि भव्य उपस्थितीमुळे ती सेलिब्रिटीजची आवडती गाडी बनली आहे. भारतामध्ये Hummer अधिकृतपणे लाँच झालेली नाही, मात्र काही श्रीमंत व्यक्ती ती खासगी इम्पोर्टद्वारे देशात आणतात. मीका सिंग यांची ही ‘ब्लॅक-अँड-गोल्ड Hummer’ आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

Leave a Comment