
Honda CB300R 2023 In Marathi : होंडा कंपनीने भारतात नवीन 2023 CB300R निओ स्पोर्ट्स कॅफे रोडस्टर बाईक लाँच केली आहे. ही बाईक OBD-2 अनुरूप आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 2.40 लाख आहे. पर्ल स्पार्टन रेड आणि मॅट मॅसिव्ह ग्रे मेटॅलिक या दोन रंगांमध्ये ही बाईक सादर करण्यात आली आहे. ही बाईक CB1000R लिटर-क्लास रोडस्टरपासून प्रेरित आहे.
डिझाईन आणि हार्डवेअर (Honda CB300R 2023)
ही बाईक मस्क्यूलर फ्युल टँक आणि मजबूत अपस्वेप्ट एक्झॉस्टसोबत येते. यात गोल आकाराचे एलईडी हेडलॅम्प, एलईडी विंकर्स आणि एलईडी टेल लॅम्प येते. यात पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील आहे. यात आता इमर्जन्सी स्टॉप सिग्नल आणि हेजार्ड लाईट स्विच देखील मिळतो. या बाईकचे वजन 146 किलोग्रॅम आहे, ज्यामुळे ती त्याच्या रेंजमधील सर्वात हलकी बाईक आहे.

हेही वाचा – Affordable Sunroof Cars : सनरूफवाली गाडी घ्यायचीय? बजेट कमी आहे?
सस्पेन्शन (New Honda CB300R Bike)
या बाईकला 41 मिमी USD फ्रंट फोर्क्स आणि मागील चाकामध्ये अॅडजस्टेबल मोनोशॉक सस्पेन्शन मिळते. ब्रेकिंगसाठी, समोर 296 mm डिस्क ब्रेक आणि ड्युअल चॅनल ABS सह मागील बाजूस 220 mm डिस्क ब्रेक आहे.

इंजिन (2023 Honda CB300R)
या बाईकमध्ये 286.01cc, 4-स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर BSVI, OBD2A, PGM-FI इंजिन आहे. हे इंजिन 30.7bhp आणि 27.5Nm जनरेट करण्यास सक्षम आहे. या बाईकला 6 गिअर आहेत आणि असिस्ट स्लिपर क्लच देखील आहे, ज्यामुळे गीअरशिफ्ट करणे सोपे होते.