Rajasthan VIP Number Case : जीवनात मेहनत केल्यास अशक्य काही नसते, हे सिद्ध करणारी राजस्थानमधील एक प्रेरणादायी कथा सध्या देशभर चर्चेत आहे. जयपूरच्या सुप्रसिद्ध बिझनेसमॅन राहुल तनेजा यांनी आपल्या मुलासाठी ऑडी कारसोबत राजस्थानचा सर्वात महागडा VIP कार नंबर RJ 60 CM 0001 तब्बल ₹31 लाख देऊन मिळवला आहे. फक्त मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी केलेला हा खर्च आता चर्चेचा विषय ठरला आहे.
ऑटो रिक्शाच्या पुढच्या सीटवरून… लक्झरी कारच्या बॅकसीटपर्यंत!
आज करोडोंची संपत्ती आणि सुपर लक्झरी कार कलेक्शन असलेले राहुल तनेजा एकेकाळी संघर्षाच्या खडतर वाटेवर चालत होते. मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील एका छोट्या गावात जन्मलेले राहुल यांचे वडील सायकल पंचर बनवण्याचे काम करत, तर आई शेतीत मजुरी करत होती.
11 व्या वर्षापासूनच राहुल यांनी संघर्षाला सुरुवात केली–
- जयपूरमधील एका ढाब्यावर वेटरची नोकरी
- दिवाळीत फटाके, होळीत रंग विक्री
- पतंग, राख्या, कॉमिक्स विकणे
- वृत्तपत्र वितरण, टु-लेट सर्विस
- रात्री 9 ते 12 ऑटो रिक्शा चालवणे
हा प्रवास पुढे बदलू लागला…
व्यवसाय + मॉडेलिंग = यशाची स्वप्नपूर्ती
- 19 व्या वर्षी – “कार पॅलेस” नावाने कार बाजार
- 1999 – मिस्टर जयपूर, मिस्टर राजस्थान, मेल ऑफ द इयर किताब
- 2000 – “Live Creations” इव्हेंट कंपनीz
- 2010 – “Rahul Taneja Premium Weddings”
एकामागून एक क्षेत्रात यश मिळवत राहुल आज लग्न व्यवस्थापन, लक्झरी कार आणि VIP नंबर कलेक्शनसाठी ओळखले जातात.
हेही वाचा – New Hyundai Venue vs Maruti Brezza : कोणती SUV जास्त पॉवरफुल? फीचर्स, मायलेज, किंमत, तुलना जाणून घ्या!
मुलासाठी लाखोंची भेट
राहुल यांचा मुलगा रेहान तनेजा 18 वर्षांचा होत आहे. सात वर्षांपूर्वी राहुल यांनी त्याला वचन दिले होते, “तू मोठा झालास आणि माझी परिस्थिती परवानगी देत असेल तर तुझी आवडती कार मी तुला गिफ्ट करीन.” आज ते वचन पूर्ण झाले. ऑडी कार आणि राजस्थानचा सर्वात महागडा VIP नंबर!
“माझ्या मुलाच्या आनंदापेक्षा महत्त्वाचं काही नाही”
महागडा नंबर घेतल्याबद्दल विचारल्यावर राहुल म्हणाले, “मी आजमध्ये जगतो. माझ्या मुलाला कार आणि तिचे नंबर आवडतात, त्याच्या आनंदासाठी हे सर्व केलं.” फक्त संपत्ती नाही, तर वडिलांचे प्रेम आणि मेहनतीची प्रेरणा ही कथा अधिक खास बनवते.