Tata Sierra ची संपूर्ण प्राईस लिस्ट जाहीर! Adventure+ वेरिएंटने तर गेमच बदलला!

WhatsApp Group

Tata Sierra Price All Variants : टाटा मोटर्सने भारतीय SUV मार्केटमध्ये धडाकेबाज पुनरागमन करत नवीन Tata Sierra च्या सर्व वेरिएंट्सच्या किंमती जाहीर केल्या आहेत. आधी फक्त Smart+ पेट्रोल व्हेरिएंटची किंमत जाहीर झाली होती; मात्र आता कंपनीनं Pure, Pure+, Adventure आणि Adventure+ या सर्व व्हेरिएंट्सचा प्राईस ब्रेकअप शेअर केला आहे. SUV खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक मोठी अपडेट ठरते.

Tata Sierra सर्व वेरिएंट्सची प्राईस लिस्ट (Ex-showroom)

वेरिएंटइंजिन + गिअरबॉक्सकिंमत
Smart+पेट्रोल MT₹11.49 लाख
डिझेल MT₹12.99 लाख
Pure1.5 Revotron पेट्रोल MT₹12.99 लाख
1.5 Revotron पेट्रोल DCA₹14.49 लाख
1.5 Cryojet डिझेल MT₹14.49 लाख
1.5 Cryojet डिझेल AT₹15.99 लाख
Pure+1.5 Revotron पेट्रोल MT₹14.49 लाख
1.5 Revotron पेट्रोल DCA₹15.99 लाख
1.5 Cryojet डिझेल MT₹15.99 लाख
1.5 Cryojet डिझेल AT₹17.49 लाख
Adventure1.5 Revotron पेट्रोल MT₹15.29 लाख
1.5 Revotron पेट्रोल DCA₹16.79 लाख
1.5 Cryojet डिझेल MT₹16.49 लाख
Adventure+1.5 Revotron पेट्रोल MT₹15.99 लाख
1.5 Hyperion Turbo पेट्रोल AT₹17.99 लाख
1.5 Cryojet डिझेल MT₹17.19 लाख
1.5 Cryojet डिझेल AT₹18.49 लाख

Tata Sierra Smart+: फीचर्स आणि किंमत

कंपनीने या SUV मध्ये नवीन डिझेल Smart+ वेरिएंट जोडला आहे. याची किंमत ₹12.99 लाख असून हे फक्त मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे.

या वेरिएंटमध्ये मिळणारे फीचर्स

  • Light Saber DRLs
  • Electronic Parking Brake (Auto Hold सह)
  • Push-button Start
  • Rear AC Vents
  • R17 व्हील्स
  • 4 Disc Brakes
  • Flush Door Handles with Welcome Lights

डॅशबोर्ड लेआउट कंपनीने अद्याप पूर्णपणे उघड केलेले नाही.

हेही वाचा – तुमचे ट्रॅफिक चालान ‘माफ’ होऊ शकतं, सरकारने जाहीर केली तारीख! ‘असा’ करा अर्ज…

Tata Sierra Pure आणि Pure+: फीचर्स, किंमती व खासियत

Pure आणि Pure+ हे वेरिएंट्स आता पेट्रोल व डिझेल दोन्ही ऑप्शनमध्ये उपलब्ध आहेत. Adventure वेरिएंट न घेता जास्त फीचर्स हवे असणाऱ्यांसाठी ही सर्वात बेस्ट निवड मानली जात आहे.

या वेरिएंट्समध्ये मिळणारे फीचर्स

  • R17 Alloy Wheels
  • Panoramic Sunroof
  • Hill Descent Control
  • 26.03 cm Touchscreen
  • Wireless Android Auto / Apple CarPlay
  • Cruise Control
  • Rear Camera
  • Rain-sensing Wipers

Tata Sierra Adventure आणि Adventure+: सर्वात प्रीमियम वेरिएंट्स

ज्यांना ऑफ-रोड क्षमता + प्रीमियम फीचर्स हवे आहेत, त्यांच्यासाठी Adventure आणि Adventure+ वेरिएंट्स तयार केलेले आहेत. या मॉडेल्समध्ये जवळपास 100 हून अधिक प्रीमियम फीचर्स उपलब्ध आहेत.

या वेरिएंट्समध्ये मिळणारे फीचर्स

  • R19 Alloy Wheels
  • 31.24 cm मोठा टचस्क्रीन
  • 360° HD Camera with Blind Spot Detection
  • Terrain Modes – Normal, Wet, Rough
  • Leatherette Steering & Gear Shifter
  • Digital Cockpit with Navigation
  • Thigh Support Extender
  • Roof Rails

Tata Sierra — आता पूर्णपणे कॉन्फिगरेबल SUV

नवीन Sierra मध्ये Smart+ पासून Adventure+ पर्यंत अनेक पर्याय असून मॅन्युअल/ऑटोमॅटिक गिअरबॉक्स, पेट्रोल/डिझेल इंजिन आणि भरपूर फीचर पॅकिंगमुळे ही SUV आजच्या सेगमेंटमधील सर्वात आकर्षक पर्यायांपैकी एक ठरत आहे.

Leave a Comment