
2023 Honda Gold Wing Tour : होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया (HMSI) ने त्यांची फ्लॅगशिप मोटरसायकल गोल्ड विंग टूरसाठी बुकिंग सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही टूरिंग मोटारसायकल भारतात पूर्णपणे तयार केलेल्या युनिटच्या रूपात उपलब्ध असेल आणि त्याची किंमत 39.20 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. होंडाच्या प्रिमियम बिगविंग टॉप लाइन डीलरशिपच्या माध्यमातून ही बाईक विकली जाईल.
HMSI चे संचालक योगेश माथूर म्हणाले, “होंडाची प्रसिद्ध गोल्ड विंग टूर (2023 Honda Gold Wing Tour) आधुनिक टूरिंग श्रेणीमध्ये क्लास-लीडिंग लक्झरी, आराम, परफॉरमन्स आणि सुरक्षिततेसह नवीन मानके प्रस्थापित करत आहे. आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की नवीन गोल्ड विंग टूरसाठी बुकिंग सुरू झाले आहे आणि या प्रीमियर लक्झरी टूरची डिलिव्हरी ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू होईल.”
फीचर्स (2023 Honda Gold Wing Tour)
गोल्ड विंग टूरमध्ये संपूर्ण एलईडी लाइटिंग सिस्टीम आहे. यात 7-इंचाचा पूर्ण-रंगाचा TFT डिस्प्ले आहे, जो Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करतो. यात रायडिंग, नेव्हिगेशन आणि ऑडिओची माहिती मिळणार आहे. या बाईकमध्ये फ्लाय स्क्रीन आहे, जी इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आहे. यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, दोन यूएसबी टाइप-सी सॉकेट्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (टीपीएमएस), एअरबॅग्ज आणि इतर अनेक फीचर्सआहेत.
इंजिन (2023 Honda Gold Wing Tour)
होंडा गोल्ड विंग टूरमध्ये 1833 cc, लिक्विड-कूल्ड, 24-व्हॉल्व्ह, फ्लॅट सिक्स-सिलेंडर इंजिन आहे, जे 125 bhp आणि 170 Nm जनरेट करते. इंजिन 7-स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन (DCT) शी जोडलेले आहे, जे पुढे आणि मागे फंक्शन्ससह येते.