अलॉय व्हील्स बसवण्यापूर्वी ही बातमी वाचा, तुमचा इन्शुरन्स क्लेम अडकू शकतो!

WhatsApp Group

Alloy Wheels Insurance Claim : तुम्ही नुकतीच नवीन कार घेतली आहे आणि तिचा लुक ‘टॉप मॉडेल’सारखा दिसावा म्हणून बेसिक व्हर्जनला थोडं स्टायलिश बनवायचं ठरवलं आहे. मित्र म्हणतात, “थोडे 10-15 हजार रुपये लावा, गाडी एकदम टॉप व्हर्जनसारखी दिसेल! पण फक्त दिसण्यासाठी केलेला हा बदल कधी तुमचं नुकसान करू शकतो हे फारच थोड्या लोकांना माहीत असतं.

कथा अशी सुरू होते…

गाडी घेतल्यानंतर तुम्ही सीट कव्हर, एम्बिएंट लाइट्स, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टील व्हील्सच्या जागी अ‍ॅलॉय व्हील्स बसवता. गाडीचं रूप खरंच बदलतं! लोक रस्त्यावरून बघायला थांबतात. पण एक दिवस, छोटासा अपघात होतो. गाडीचं नुकसान होतं आणि तुम्ही इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम करता… तेव्हाच येतो ट्विस्ट!
कंपनी क्लेम नाकारते. कारण? अ‍ॅलॉय व्हील्स!

इन्शुरन्स क्लेम नाकारण्याचं खरं कारण

अनेकदा अपघाताचं कारण “व्हील फेल्युअर” असतं, म्हणजे व्हीलने योग्य वेळेत ब्रेकिंग सपोर्ट दिला नाही.
जर तुम्ही गाडीमध्ये मान्यताप्राप्त नसलेले अ‍ॅलॉय व्हील्स बसवले असतील, तर हे तुमच्या इन्शुरन्स क्लेमला नकार देण्याचं वैध कारण ठरू शकतं.

नेहमी BIS मार्क असलेले अ‍ॅलॉय व्हील्सच घ्या

नवीन व्हील्स बसवताना ते BIS (भारतीय मानक ब्युरो) प्रमाणित आहेत का, हे नक्की तपासा. जर ते BIS किंवा ISI मार्कशिवाय असतील, तर त्यांची क्वालिटी हमीशीर नसते. अशा व्हील्समध्ये तडे जाण्याची शक्यता जास्त असते, आणि ब्रेकिंग, कंट्रोल किंवा हाय-स्पीड ड्रायव्हिंगदरम्यान मोठा अपघात घडू शकतो.
तसेच, त्यांचा लाईफ स्पॅन कमी असतो म्हणजे वारंवार रिप्लेसमेंट करून खर्च वाढतो.

टायरही बदला, फक्त व्हील्स नाही!

जेव्हा तुम्ही नवीन व्हील्स बसवता, तेव्हा टायरही त्यानुसार बदलणे गरजेचे असते. कारण प्रत्येक व्हील साईजसाठी टायरचा वेगळा साईज आवश्यक असतो. जर चुकीचे टायर वापरले, तर गाडीची ब्रेकिंग, कंट्रोल आणि हँडलिंग बिघडते — म्हणजेच तुमच्या सेफ्टीला धोका. मोठ्या व्हील्सकडे अपग्रेड करत असाल, तर लो-प्रोफाइल टायर्स योग्य ठरतात.

सस्पेन्शन आणि ब्रेकिंगवर परिणाम

अ‍ॅलॉय व्हील्सचा थेट परिणाम गाडीच्या सस्पेन्शन आणि ब्रेकिंग सिस्टमवर होतो. मोठ्या साईजचे अ‍ॅलॉय व्हील्स बसवताना सस्पेन्शनमध्ये योग्य बदल करणे गरजेचे आहे. असे न केल्यास ब्रेकिंग परफॉर्मन्स कमी होतो आणि गाडी अनकंफर्टेबल बनते.

इन्शुरन्स कंपनीला आधी माहिती द्या

गाडीमध्ये कोणताही बदल (मॉडिफिकेशन) करताना सर्वप्रथम तुमच्या इन्शुरन्स कंपनीला कळवा. तसेच, RTO कडून परवानगी घेणं आवश्यक आहे. हे केल्याने भविष्यातील क्लेम किंवा कायदेशीर अडचणी टळतात.
काही इन्शुरन्स कंपन्या आजकाल ड्रायव्हर ओळखण्यासाठी DNA टेस्टसुद्धा करतात, त्यामुळे चुकीची माहिती देणे शक्यच नाही.

थोडक्यात सल्ला

अ‍ॅलॉय व्हील्स घ्यायचेच असतील तर BIS मार्क असलेलेच घ्या.
टायर साईज सुसंगत ठेवा.
मोठे व्हील्स बसवण्याआधी तज्ज्ञ सल्ला घ्या.
इन्शुरन्स आणि RTOला बदलांची माहिती द्या.
दिसण्यापेक्षा सेफ्टीला प्राधान्य द्या.

Leave a Comment