अभिषेक शर्माला मिळाली 33 लाखांची प्रीमियम गाडी! कोणती SUV आहे ही? इतकं भारी काय आहे तिच्यात?

WhatsApp Group

Abhishek Sharma SUV Asia Cup 2025 : एशिया कप 2025 मध्ये आपली आक्रमक खेळी आणि अष्टपैलू कामगिरीने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिषेक शर्माची निवड ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून झाली आहे. याच गौरवाच्या प्रतीकार्थ, त्याला इनाम म्हणून मिळाली आहे एक अत्यंत प्रीमियम आणि पॉवरफुल SUV – HAVAL H9.

ही SUV खास का?

HAVAL H9 ही एक फुल-साइज लग्जरी SUV असून ती तिच्या रग्गड रस्त्यांवरील कामगिरी, स्टायलिश डिझाईन आणि अत्याधुनिक फीचर्ससाठी ओळखली जाते. भारतात ती अजून अधिकृतरीत्या उपलब्ध नसली, तरी सौदी अरेबियामध्ये ही SUV खूप लोकप्रिय आहे.

इंजिन आणि परफॉर्मन्स

  • इंजिन: 2.0L टर्बोचार्ज्ड 4-सिलेंडर (Gasoline 91)
  • टॉर्क: 380 NM
  • गिअरबॉक्स: 8-स्पीड ऑटोमॅटिक ZF ट्रान्समिशन
  • ड्राईव्ह मोड्स: Auto, Eco, Sport, Sand, Snow, Mud, 4L

HAVAL H9 शहराच्या रस्त्यांवर जितकी मऊ आणि आरामदायक वाटते, तितकीच ती खडबडीत रस्त्यांवरही जबरदस्त कामगिरी करते.

सेफ्टीमध्ये टॉप क्लास

  • 6 एअरबॅग्स
  • ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन
  • एडॅप्टिव क्रूज कंट्रोल – ट्रॅफिकप्रमाणे आपोआप स्पीड अ‍ॅडजस्ट
  • ट्रॅफिक जाम असिस्ट – जाममध्येही स्ट्रेसफ्री ड्रायव्हिंग
  • 360 डिग्री कॅमेरा – पार्किंग आणि व्हिजिबिलिटी साठी

SUV चे मापदंड

  • लांबी: 4950 mm
  • रुंदी: 1976 mm
  • टायर साइज: 265/55 R19
  • डिझाईन: फ्रंट आणि रियर फॉग लॅम्प्स, इलेक्ट्रिक साइड स्टेप, पॅनोरॅमिक सनरूफ

हेही वाचा – Maruti Victoris vs Hyundai Creta : SUV घ्यायचीय? मग ही तुलना पाहिल्याशिवाय निर्णय घेऊ नका!

इंटीरियर म्हणजे लक्झरीचा अनुभव

  • 14.6 इंच टचस्क्रीन डिस्प्ले
  • 10 स्पीकर्स – साउंड सिस्टीमसाठी
  • वायरलेस चार्जिंग
  • लेदर मेमरी सीट्स – तुमच्या सवयी लक्षात ठेवणाऱ्या सीट्स
  • व्हेंटिलेटेड व मसाज सीट्स – उन्हाळ्यातही आराम आणि रिफ्रेशमेंट

SUV ची किंमत

HAVAL H9 ची किंमत सौदी अरेबियात सध्या 1,42,199.8 सऊदी रियाल आहे, जी भारतीय चलनात सुमारे ₹33,60,658 होते (सेप्टेंबर 2025 नुसार विनिमय दर).

कंपनीबद्दल थोडक्यात

HAVAL हा Great Wall Motors (GWM) या चीनी ऑटोमोबाईल कंपनीचा SUV ब्रँड आहे. मार्च 2013 पासून हवल ही स्वतंत्र SUV लाइन बनली असून आंतरराष्ट्रीय SUV मार्केटमध्ये तिचं नाव आहे.

Leave a Comment