
Andhra Pradesh Auto Driver Scheme : आंध्र प्रदेश सरकारने राज्यातील ऑटो रिक्षा, मोटर कॅब आणि मॅक्सी कॅब चालवणाऱ्या ड्रायव्हर्ससाठी मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हे शनिवार, 21 सप्टेंबर रोजी ‘ऑटो ड्रायव्हरला सेवेलो’ योजना लाँच करत आहेत. या योजनेंतर्गत 2.9 लाखांहून अधिक पात्र ऑटो आणि कॅब चालकांना दरवर्षी ₹15000 थेट बँक खात्यात दिले जाणार आहेत.
या उपक्रमाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम विजयवाडा मध्य विधानसभा क्षेत्रात होणार असून, राज्य सरकारने यासाठी ₹436 कोटींचा निधी मंजूर केला आहे. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.
मुख्यमंत्र्यांनी या योजनेची तुलना माजी वायएसआर काँग्रेस सरकारच्या योजनेशी केली, ज्यात 2.6 लाख लाभार्थ्यांना दरवर्षी फक्त ₹10000 दिले जात होते, त्यासाठी ₹261 कोटी खर्च करण्यात आले होते. नायडूंनी स्पष्ट केलं की, एनडीए सरकारने आर्थिक मदतीत तब्बल 50% वाढ करून ही योजना अधिक व्यापक केली आहे.
हेही वाचा – 9.99 लाखात एवढी कडक SUV कुठं मिळणार? थारनं पुन्हा धक्का दिलाय!
कोण पात्र आहे?
- 2.2 लाख ऑटो ड्रायव्हर्स
- 39000 तिपहिया प्रवासी वाहन चालक
- 20000 मोटर कॅब चालक
- 6400 मॅक्सी कॅब चालक
या लाभार्थ्यांपैकी फक्त विशाखापट्टणम जिल्ह्यातच सुमारे 23000 लोकांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, ही योजना एनडीएच्या निवडणूक घोषणापत्रात नसतानाही, मुख्यमंत्री नायडूंनी महिलांसाठी मोफत बसयात्रा देणाऱ्या ‘स्त्री शक्ती’ योजनेचा प्रतिकार म्हणून ही आर्थिक योजना सुरू केली आहे, जेणेकरून ऑटो-ड्रायव्हर्सवर परिणाम होणार नाही.