सेफ्टीत आणि भारी दिसण्यात 1 नंबर गाडी, 10 लाखात अजून काय हवं!

WhatsApp Group

रस्त्यावर लोक पाहतच बसतील, अशी लक्झरीवाली, भारी दिसणारी गाडी आपल्याकडे असावी, असे स्वप्न प्रत्येकाचे असते. पण अशी कार घेण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात, हे आपणा सर्वांना माहीत आहे. अशी बहुतेक गाड्या बजेटच्या बाहेर असतात. पण आता अशा कमी किमतीच्या प्रीमियम कार भारतीय बाजारपेठेत आल्या आहेत, ज्या 5 स्टार सुरक्षा रेटिंगसह येतात. याशिवाय फिचर्सही टॉप क्लास असतात. यातील एक गाडी म्हणजे, ह्युंदाईची वेर्ना (Hyundai Verna In Marathi).

पावरफुल इंजन

ह्युंदाई वेर्नामध्ये दोन इंजिन ऑप्शन दिले आहेत. एक 1.5 लिटर नॅचरली एस्पिरेटेड इंजिन हे115 bhp पॉवर आणि 144 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन हे 160 bhp पॉवर आणि 253 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन केवळ ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. कारचे मायलेज 20 ते 24 किलोमीटर प्रति लिटरपर्यंत आहे.

सेफ्टी फीचर्स

  • 6 एअरबॅग्ज
  • इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल नियंत्रण (ESC)
  • इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS)
  • रिव्हर्स पार्किंग सेन्सर
  • ऑटो हेडलॅम्प
  • आयसोफिक्स
  • टायमरसह रियर डिफॉगर
  • इम्पॅक्ट सेन्सिंग डोर अनलॉक
  • हाईट अॅडजस्टमेंट ड्रायव्हर सीट

नवीन ह्युंदाई वेर्नाच्या उच्च ट्रिम्समध्ये हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल, व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, फ्रंट पार्किंग सेन्सर्स आणि गाईडलाईन्स रियर पार्किंग कॅमेरा देखील मिळतात. अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) कारच्या टॉप व्हेरिएंटमध्ये देखील उपलब्ध आहे.

हेही वाचा – New Renault Duster 2024 : आधीपेक्षा मोठी, तगडी, भारी दिसणारी नवीन रेनॉल्ट डस्टर!

आतून लक्झरी फील

ह्युंदाई वेर्नामध्ये 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि डिजिटल ड्रायव्हर डिस्प्लेसह ड्युअल स्क्रीन सेटअप समाविष्ट आहे. या गाडीत आठ-स्पीकर बोस साउंड सिस्टीम, इंफोटेनमेंट आणि AC साठी स्विचेबल कंट्रोल, 64 कलर अॅम्बियंट लाइटिंग, सिंगल-पेन सनरूफ, एअर प्युरिफायर आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स देखील आहेत.

ह्युंदाई वेर्ना भारतात 14 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. बेस व्हेरिएंटची किंमत ₹10.96 लाख एक्स-शोरूम आहे, तर टॉप व्हेरिएंटची किंमत ₹17.38 लाख एक्स-शोरूम आहे.

Leave a Comment