टाटा बॅकफुटवर..! भारतात लाँच झाली ‘स्वस्त’ SUV; किंमत 7.99 लाख रुपये

WhatsApp Group

Citroen Basalt launched In India : फ्रेंच कार निर्माता कंपनी Citroen ने आज अधिकृतपणे आपली नवीन कूप-शैलीची SUV Citroen Basalt भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी लाँच केली आहे. Citroen ने ही नवीन SUV फक्त 7.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत सादर केली आहे. लाँच झाल्यानंतर कंपनीने त्याचे अधिकृत बुकिंगही सुरू केले आहे. त्याचे ग्राहक केवळ 11,001 रुपयांच्या टोकन रकमेसह कंपनीच्या डीलरशिप आणि अधिकृत वेबसाइटद्वारे बुक करू शकतात. ही एक प्रास्ताविक किंमत आहे जी केवळ 31 ऑक्टोबरपर्यंत बुक केलेल्या गाड्यांवर लागू होईल. याचा अर्थ भविष्यात कंपनी या एसयूव्हीची किंमत वाढवू शकते.

बेसाल्ट कंपनीच्या C3 एअरक्रॉस मॉडेलपासून प्रेरित आहे. त्याचा पुढचा लूक एअरक्रॉससारखाच आहे. स्लोपी रुफ त्यास कूप-बॉडी शैली देते. यात नवीन डिझाइन केलेले अलॉय व्हील, एलईडी टेल लॅम्प आणि चंकी ड्युअल-टोन रिअर बंपर आहे. ही गाडी 5 मोनोटोन कलर व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आली आहे, ज्यात पोलर व्हाइट, स्टील ग्रे, प्लॅटिनम ग्रे, कॉस्मो ब्लू आणि गार्नेट रेड यांचा समावेश आहे.

पॉवर आणि परफॉरमन्स

ही गाडी कंपनीने दोन पेट्रोल इंजिन व्हेरिएंटसह बाजारात आणली आहे. या SUV मध्ये कंपनीने 1.2 लिटर क्षमतेचे तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 82hp पॉवर आणि 115Nm टॉर्क जनरेट करते. याचे टर्बो पेट्रोल इंजिन 110hp पॉवर जनरेट करते. हे टर्बो इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. तर नॅच्युरल एस्पिरेटेड इंजिनमध्ये फक्त 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे.

केबिन आणि फीचर्स

या गाडीची केबिन मोठ्या प्रमाणात बनवण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले आहेत. तिचा डॅशबोर्ड C3 Aircross सारखाच आहे. यात 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, थ्री-स्पोक स्टीयरिंग व्हील, रिअर एसी व्हेंट्स, वायरलेस ऍपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी यांसारखी फीचर्स आहेत.

कंपनीने त्यात काही किरकोळ बदल करून बेसाल्टची ओळख करून दिली आहे. याला मागील सीटसाठी एड्जेस्टेबल थाई सपोर्ट देखील मिळतो, जो सेगमेंटमध्ये प्रथमच दिसत आहे. कंपनीचा दावा आहे की या कारमध्ये 470 लीटरची बूट स्पेस आहे.

हेही वाचा – सुझुकी, टाटाचं मार्केट खाणार..! ट्विन CNG सिलिंडरसोबत भारतात आली Hyundai ची कार, मायलेज कमाल

कंपनीने फक्त बेस मॉडेलची किंमत जाहीर केली आहे. आगामी काळात कंपनी त्याच्या इतर व्हेरिएंटच्या किंमती जाहीर करेल. तत्काळ पाहिल्यास ही SUV भारतीय बाजारपेठेत थेट Tata Curve शी स्पर्धा करेल. पण Citroen ने ही SUV अतिशय किफायतशीर दरात लाँच करून टाटा मोटर्सवर नक्कीच दबाव आणला आहे. सध्या टाटा नेक्सॉनची किंमत, जी टाटाची दुसरी सर्वात परवडणारी SUV आहे, त्याची किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरू होते.

Leave a Comment