VIDEO : चांगल्या मायलेजसाठी स्कूटरला लावा CNG किट! किती खर्च येईल?

WhatsApp Group

CNG Kit For Scooters In Marathi : पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे आता गाड्या चालवणे महाग झाले आहे. त्यामुळे लोकांनी सीएनजी वाहने अधिक खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. साधारणपणे, तुम्ही अनेक शहरांमध्ये सीएनजीवर चालणाऱ्या कार आणि बसेसबद्दल ऐकले असेल आणि पाहिले असेल, परंतु तुम्हाला माहीत आहे का की बाईकही सीएनजीवर चालतात? हो तुम्ही बरोबर ऐकले आहे, आता अनेक शहरांमध्ये सीएनजी स्कूटरही धावू लागल्या आहेत. आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच पडत असेल की जर आजपर्यंत कोणत्याही कंपनीने सीएनजी टू-व्हीलर लाँच केलेली नाही, तर मग या बाजारात उपलब्ध कशा?

स्कूटरमध्ये सीएनजी किट बसवून ती सीएनजीवर चालण्यास सक्षम बनवली आहे. पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वर गेले आहेत हे तुम्हाला माहिती आहेच. तर Activa, Jupiter सारख्या स्कूटरचे मायलेज सुमारे 40-45 किलोमीटर आहे. अशा परिस्थितीत त्यांना चालवणे खूप महागात पडते. त्यामुळे आता बर्‍याच कंपन्या स्कूटरसाठी सहज बसणारे सीएनजी किट बनवत आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की सीएनजीवर स्कूटर चालवण्याची किंमत फक्त 70 पैसे प्रति किलोमीटर आहे. तुम्ही तुमच्या स्कूटरमध्ये CNG किट कसे लावू शकता ते जाणून घ्या.

स्कूटरमध्ये लावा सीएनजी किट (CNG Kit For Scooters)

जर तुम्हाला तुमच्या स्कूटरच्या कमी मायलेजबद्दल काळजी वाटत असेल तर तुम्ही त्यात सीएनजी किट लावू शकता. हे सीएनजी किट होंडा अ‍ॅक्टिव्हा, टीव्हीएस ज्युपिटर, हीरो मेस्ट्रो, सुझुकी अॅक्सेस किंवा इतर कोणत्याही स्कूटरमध्ये सहज स्थापित केले जाऊ शकते. अशा अनेक कंपन्या आहेत ज्या बाईकसाठी सीएनजी किट बनवत आहेत.

हेही वाचा – फेस्टिव सीजनला स्वस्त झाल्या गाड्या! 90 हजारापर्यंत ‘बंपर’ डिस्काऊंट

हे किट बसवण्यासाठी सुमारे 18,000 रुपये खर्च येतो. हे बसवणाऱ्या कंपन्यांचे म्हणणे आहे की, हा खर्च तुम्ही एका वर्षापेक्षा कमी कालावधीत वसूल करू, कारण सध्या सीएनजी आणि पेट्रोलच्या दरात 40 रुपयांची तफावत आहे.

स्कूटरमध्ये सीएनजी किट स्थापित करण्यासाठी सुमारे 4 तास लागतात. पण, विशेष म्हणजे हे पेट्रोलवरही चालवता येते. यासाठी कंपनी एक स्विच बसवते, ज्याद्वारे तुम्ही तुमची स्कूटर सीएनजी मोडवरून पेट्रोल मोडवर आणू शकता. कंपनीने या स्कूटरच्या पुढच्या भागात दोन सिलिंडर बसवले आहेत, जे अशा प्रकारे बसतात की स्कूटरमध्ये सिलिंडर बसवलेले आहेत हे लक्षातही येणार नाही. याला ऑपरेट करण्यासाठी मशीनही सीटच्या खालच्या भागात बसवण्यात आली आहे. टाकीची एकूण क्षमता १.२ किलो सीएनजी आहे.

Leave a Comment