CNG Price Cut : भारतामध्ये दर महिन्याला लाखो गाड्यांची विक्री होते आणि त्यातील मोठा वाटा CNG कारांचा असतो. गेल्या काही वर्षांत CNG च्या किमती सलग वाढल्यामुळे कारधारकांच्या खिशाला मोठा फटका बसला. मात्र आता CNG कार वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नव्या वर्षात CNG च्या दरात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जरी सरकारकडून यासंदर्भात अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी विविध रिपोर्ट्सनुसार CNG दरात 1.25 रुपये ते 2.50 रुपये प्रति किलो पर्यंत घट होऊ शकते. जर असे झाले तर देशभरातील CNG वाहनधारकांना थेट फायदा होणार असून, त्यांचा प्रवास खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल.
CNG स्वस्त का होऊ शकते?
पेट्रोलियम आणि नेचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड (PNGRB) यांनी Gas Transportation Unified Tariff System मध्ये महत्वाचे बदल केले आहेत. “One Nation – One Tariff” या उद्दिष्टातून हा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात गॅस ट्रान्सपोर्ट टॅरिफ एकसमान करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याचा परिणाम CNG च्या अंतिम किमतींवर दिसू शकतो.
या बदलांनुसार, 1 जानेवारी 2026 पासून 300 किमी पर्यंत वाहतुकीसाठी 54 रुपये प्रति MMBTU, तर 300 किमीपेक्षा जास्त अंतरासाठी 102.86 रुपये प्रति MMBTU शुल्क राहणार आहे. मात्र ग्राहकांना कुठल्याही अंतरासाठी 54 रुपये प्रति MMBTU एवढेच शुल्क देणे अपेक्षित आहे. त्यामुळे CNG च्या वाहतुकीचा खर्च कमी होईल आणि दर घटण्याची शक्यता वाढली आहे.
सध्या CNG चे दर किती?
दिल्लीमध्ये IGL कडून उपलब्ध होणाऱ्या CNG चे दर सध्या ₹77.09 प्रति किलो आहेत. नोएडा आणि गाझियाबादमध्ये CNG ₹85.70 प्रति किलो मिळते. जर नवीन प्रणाली लागू झाली तर या दरांत कपात होऊ शकते.
कारधारकांसाठी काय फायदे?
- महिन्याचा इंधन खर्च कमी
- लांब पल्ल्याच्या प्रवासात मोठी बचत
- पेट्रोल-डिझेलपेक्षा अजून स्वस्त पर्याय
- CNG कार खरेदीकडे लोकांचा कल वाढण्याची शक्यता
सध्या अधिकृत घोषणा बाकी असली तरी CNG वापरणाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. नवीन वर्षात जर CNG स्वस्त झाली, तर लाखो कारधारकांसाठी ही खूप मोठी खुशखबर ठरेल.