Driverless Car India Viral Video : बंगळुरूच्या आर.व्ही. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॅम्पसमध्ये एक स्वयंचलित, चालकविरहित (Driverless) कार फिरताना दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे. खास म्हणजे, या कारमध्ये उत्तरादी मठाचे श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजी स्वतः बसून ट्रायल राइड घेताना दिसत आहेत. हा अनोखा प्रसंग पाहून नेटिझन्समध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
या व्हिडिओमध्ये कार पूर्णपणे स्वतःहून कॅम्पस परिसरात फिरताना दिसते, तर स्वामीजी शांतपणे आसनस्थ आहेत. कारच्या डिझाइनपासून ते सुरक्षिततेपर्यंत सगळीकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाल्याचे दिसून येते.
BREAKING 🚨
— Oxomiya Jiyori 🇮🇳 (@SouleFacts) October 30, 2025
India’s first driverless car has been unveiled by IISc, Wipro, and RV College in Bengaluru.
From AI labs to Indian roads- the autonomous revolution is no longer theory. pic.twitter.com/8oTUNf6vZw
कोण विकसित करतंय ही कार?
ही ड्रायव्हरलेस कार Wipro, IISc (Indian Institute of Science) आणि RV College of Engineering यांच्या संयुक्त उपक्रमातून विकसित केली जात आहे. हा प्रकल्प WIRIN (Wipro-IISc Research and Innovation Network) अंतर्गत राबवला जात आहे.
हेही वाचा – Video : चार वर्षांनंतर Duster चे कमबॅक, कंपनीने केली घोषणा, जबरदस्त लूक!
WIRIN उपक्रमाचा उद्देश भारतात AI, Robotics, Autonomous Systems आणि Smart Technology क्षेत्रात जागतिक दर्जाचे संशोधन व नवोपक्रम गती देणे आहे. यासाठी Wipro आणि IISc यांच्यात आधीच MoU (करार) झाला आहे. RV कॉलेजकडून तांत्रिक व इंजिनिअरिंग कौशल्य पुरवले जात आहे.
Big Achievement 🔥
— Global Post Feed (@Globalpostfeed) October 30, 2025
India made its First Self-driving (Driverless) Car 'WIRIN' which is built by Wipro, IISc and RV College Bengaluru.
It took 6 years of research, focusing on AI, robotics, and machine learning.
Its 100% Made in India innovation.
Video 📷#ElectricVehicles pic.twitter.com/A6vomKeEQM
कोणत्या तंत्रज्ञानावर काम सुरू?
या प्रकल्पात प्रमुख लक्ष केंद्रित केले जात आहे:
- Autonomous Systems: Imaging, Image Processing, Computer Vision
- Artificial Intelligence व Machine Learning
- Deep Learning Algorithms
- Data Science व Cybersecurity
- Smart Materials & Disruptive Manufacturing
सध्या भारतीय रस्त्यांच्या स्थितीचा सूक्ष्म अभ्यास आणि रूट-मॅपिंग सुरू असून, काही महिन्यांत हा प्रकल्प औपचारिकपणे सादर होण्याची शक्यता आहे.
भारतातील स्वयंचलित वाहनांचं भविष्य?
भारतामध्येही ड्रायव्हरलेस तंत्रज्ञानाला गती मिळत आहे. IIT हैदराबाद येथेही autonomous tech विकसित केली जात आहे. त्यांनी शेती व खाणकामासारख्या कठीण भूभागांवर वापरण्यासाठी स्वयंचलित वाहनं तयार केली असून ती कॅम्पसमध्ये लोकांना वाहतूक करून देतात.
जगात काय?
अमेरिकेत Tesla चे CEO एलोन मस्क यंदाच कॅलिफोर्निया व टेक्सासमध्ये ड्रायव्हरलेस राइड-हेलिंग सर्विस सुरू करण्याचे आश्वासन देत आहेत. कॅलिफोर्नियामध्ये कंपनीला पहिली अधिकृत मंजुरीही मिळाली आहे.