
FASTag In Maharashtra : महाराष्ट्रातील गाडी मालकांसाठी एक मोठी बातमी आहे. 1 एप्रिल 2025 पासून राज्यात सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य असेल. देंवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तुम्ही गाड्यांना फास्ट टॅग अजूनही लावले नसेल तर तुमच्यासाठी फास्टॅग लावणे गरजेचे आहे.
आज 7 जानेवारीला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांनुसार, जर तुमच्याकडे फास्टॅग नसेल, तर तुम्हाला टोल टॅक्सच्या दुप्पट रक्कम भरावी लागते. फास्टॅग टोल 90 रुपये असेल, तर तुम्हाला पासशिवाय 180 रुपये भरावे लागतील.