FASTag नाही? मग टोल प्लाझावर कॅश दिल्यास दुप्पट शुल्क! पण UPI वापरल्यास…; जाणून घ्या नवा नियम!

WhatsApp Group

FASTag Toll New Rule : 15 नोव्हेंबर 2025 पासून, राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझांवरून जाणाऱ्या वाहनचालकांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता FASTag नसलेल्या वाहनचालकांना कॅशने टोल भरल्यास दुप्पट शुल्क आकारले जाणार आहे, तर UPI ने भरल्यास केवळ 1.25 पट शुल्क लागू होईल.

रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने 2008 मधील राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांमध्ये सुधारणा करत ही नवी अंमलबजावणी जाहीर केली आहे. या निर्णयामागचा उद्देश स्पष्ट आहे – देशभरातील टोल वसुली प्रक्रिया अधिक डिजिटल, पारदर्शक आणि कार्यक्षम बनवणे.

उदाहरण समजून घ्या

  • FASTag वापरल्यास ₹100 टोल
  • कॅश दिल्यास ₹200 (दुप्पट)
  • UPI ने भरल्यास ₹125 (1.25 पट)

नवा नियम का लागू केला गेला?

सरकारचा हेतू स्पष्ट आहे, कॅश व्यवहार कमी करून डिजिटल पेमेंटला चालना देणे. FASTag आणि UPI चा वापर वाढल्यास वाहनचालकांना टोल नाक्यांवर रांगा लावण्याची गरज भासत नाही, आणि वेळेची बचत होते. यामुळे टोल संकलन अधिक पारदर्शक आणि जलद होईल.

हेही वाचा – हायवेवर लवकरच लागणार हायटेक QR कोड बोर्ड, एक स्कॅन आणि मिळेल प्रवासातील सगळी गरजेची माहिती!

नागरिकांवर याचा काय परिणाम होईल?

तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय अजूनही कॅशवर अवलंबून असलेल्या नागरिकांसाठी एक चेतावणी आहे. FASTag आता अनिवार्य झाला आहे. UPI सारख्या डिजिटल पर्यायांचा वापर केल्यास पैसे आणि वेळ दोन्हीची बचत होईल.

हे सर्व कधीपासून लागू?

हा नवा नियम 15 नोव्हेंबर 2025 पासून देशभर लागू होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी तात्काळ आपल्या वाहनावर FASTag बसवावा आणि UPI द्वारे टोल भरायची सवय लावावी.

Leave a Comment