हायवेवर लवकरच लागणार हायटेक QR कोड बोर्ड, एक स्कॅन आणि मिळेल प्रवासातील सगळी गरजेची माहिती!

WhatsApp Group

QR Code Highway Board : भारतात सध्या हायवे आणि एक्सप्रेसवेचे प्रचंड जाळं विस्तारत आहे. नवीन महामार्ग उभारले जात आहेत, आणि जुने रस्तेही सरकारच्या वतीने अपग्रेड करून हायटेक सुविधा दिल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने आता आणखी एक क्रांतिकारी पाऊल उचललं आहे – लवकरच देशभरातील हायवेवर QR कोडसह हायटेक साईनबोर्ड्स लावले जाणार आहेत.

या QR कोड बोर्ड्समुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान अनेक गरजेच्या गोष्टींची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. या योजनेनुसार हायवेच्या कडेला, टोल प्लाझा, ट्रक पार्किंग, रेस्ट एरिया आणि हायवेच्या सुरुवाती व शेवटच्या ठिकाणी हे QR कोड बोर्ड्स लावले जातील.

हेही वाचा – बोलेरोचा धमाकेदार नवीन अवतार! अवघ्या ₹7.99 लाखात मिळणार ‘इतके’ जबरदस्त फीचर्स

 काय मिळणार या QR कोडमधून?

जेव्हा एखादा प्रवासी किंवा वाहनचालक मोबाईलने या QR कोडला स्कॅन करेल, तेव्हा त्याला लगेच खालील माहिती मिळणार आहे:

  • संबंधित हायवेचा क्रमांक, लांबी, निर्मितीचा कालावधी
  • सध्या दुरुस्ती सुरू आहे का याची माहिती
  • हायवे पेट्रोलिंग, टोल व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता, आपत्कालीन मदत (1033), NHAI ऑफिस यांचे थेट फोन नंबर
  • जवळील सुविधा:
    • पेट्रोल पंप
    • हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स
    • रुग्णालये
    • टॉयलेट्स
    • पोलिस स्टेशन
    • ट्रक पार्किंग
    • पंक्चर रिपेअर शॉप
    • ई-चार्जिंग स्टेशन

सायबर फसवणुकीवर लगाम

सध्या प्रवासादरम्यान गरज पडल्यास अनेकजण इंटरनेटवर शोध घेतात, पण यातून सायबर फसवणुकीचा धोका निर्माण होतो. QR कोडद्वारे अधिकृत व खात्रीशीर माहिती मिळाल्यामुळे प्रवाशांचे रक्षण होईल.

प्रवाशांसाठी गेमचेंजर सुविधा!

ही योजना केवळ माहितीपुरती मर्यादित नसून, ती प्रवासी सुरक्षेसाठी महत्त्वाची पायरी आहे. कुठे थांबायचं, कुठे पेट्रोल भरणार, आपत्कालीन वेळी कोणाला संपर्क करायचा – यासाठी वेगळं शोध घेण्याची गरजच भासणार नाही. यामुळे भारतातील हायवे प्रवास आणखी स्मार्ट, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

Leave a Comment