
Honda Cars Sales India September 2023 in Marathi : होंडा कंपनीने सप्टेंबर 2023 मध्ये देशांतर्गत बाजारात एकूण 9,861 कार विकल्या (Honda Best Cars 2023 In Marathi) आहेत. आकडा काढायचा झाला, तर यात 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीने सप्टेंबर 2022 मध्ये देशांतर्गत बाजारात 8,714 युनिट्सची विक्री केली होती. त्याच्या विक्रीत ही मोठी उडी घेण्याचे कारण म्हणजे नव्याने लाँच झालेली होंडा एलिव्हेट (Honda Elevate). या गाडीला बाजारपेठेत खरेदीदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. एलिव्हेटसह, होंडा आता भारतीय बाजारपेठेत एकूण तीन कार विकते, ज्यात सिटी आणि अमेझचाही समावेश आहे. सप्टेंबर 2023 मध्ये, एलिव्हेट ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी SUV होती कारण एकूण 5,685 युनिट्सची विक्री झाली होती. याशिवाय उर्वरित विक्री सिटी आणि अमेझची आहे.
होंडा एलिव्हेट (Honda Elevate Details In Marathi)
होंडा एलिव्हेटची एक्स-शोरूम किंमत 11 लाख ते 16 लाख रुपये आहे. नवीन एलिव्हेट ही बाजारात उपलब्ध असलेल्या मध्यम आकाराच्या SUV पैकी एक आहे. यामध्ये, कंपनीने तेच 1.5-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले आहे, जे सिटी सेडान (होंडा सिटी) मध्ये येते. ते 119 bhp आणि 145 Nm टॉर्क जनरेट करते.

हेही वाचा – आता इलेक्ट्रिक गाडी चालवताना टेन्शन घेऊ नका, संपूर्ण देशात बसवले जाणार चार्जर्स!

यात 6-स्पीड मॅन्युअल आणि CVT गिअरबॉक्सचा पर्याय आहे. कंपनीचा दावा आहे की एलिव्हेट मॅन्युअल वेरिएंट 15.31 kmpl मायलेज देऊ शकते आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंट 16.92 kmpl मायलेज देऊ शकते. हे एलिव्हेटचे ARAI प्रमाणित मायलेज आहे. यात 40 लिटरची इंधन टाकी आहे.
फीचर्स (Honda Elevate In Marathi)
या SUV कारमध्ये अँड्रॉईड ऑटो, अॅपल कापरप्ले, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7-इंच सेमी-डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस फोन चार्जर, सिंगल-पॅन सनरूफ आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल असे अनेक फीचर्स आहेत. यात अडवान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS) देखील आहे, ज्या अंतर्गत अडप्टीव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, ऑटो एमर्जन्सी ब्रेकिंग सारखे फीचर्स उपलब्ध आहेत.