
Honda Shine 100 Electric : Honda Shine 100 ही भारतातील एक अत्यंत लोकप्रिय बजेट बाईक आहे. आता हीच Shine इलेक्ट्रिक अवतारात येण्याची तयारी सुरू झाली आहे. अलीकडे समोर आलेल्या पेटंट इमेजेसनुसार, Honda Shine 100 Electric वर काम सुरू असून ती दिसायला जवळपास पेट्रोल व्हर्जनसारखीच असणार आहे, फक्त आता ती इलेक्ट्रिक मोटरवर चालणार आहे.
Shine चं डिझाईन तसंच
नवीन Shine 100 Electric मध्ये पेट्रोल इंजिनच्या जागी इलेक्ट्रिक मोटर बसवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बाईकचा फ्रेम आणि चेसिस पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आला आहे, त्यामुळे ग्राहकांना नेहमीसारखीच स्टाइल मिळणार आहे, आणि कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंगही किफायतशीर ठरणार आहे.
2 स्वॅपेबल बॅटऱ्यांचं खास फीचर
Shine 100 Electric मध्ये दोन छोट्या स्वॅपेबल बॅटऱ्या दिल्या जातील. प्रत्येक बॅटरीचं वजन सुमारे 10.2 किलोग्रॅम असून त्या दोन्ही बाजूंना फिट केल्या जातील. बॅटऱ्यांमध्ये एअरफ्लो सिस्टम दिला जाईल, ज्यामुळे बॅटरी ओव्हरहीट होणार नाही. ही सिस्टम Honda Activa Electric प्रमाणेच अत्याधुनिक असेल.
स्मार्ट कंट्रोलसाठी ECU टेक्नॉलॉजी
Shine 100 Electric च्या मध्यभागी ECU (Electronic Control Unit) दिलं जाईल, जे संपूर्ण इलेक्ट्रिक सिस्टमला स्मार्ट आणि एफिशिएंट कंट्रोल देईल. बॅटरी आणि मोटरचं प्लेसमेंट जुन्या इंजिनच्या जागेवरच केलं जात आहे.
2026 पूर्वी बाजारात येण्याची शक्यता
Honda Shine 100 Electric बद्दल कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत लॉन्च डेट जाहीर केलेली नाही. मात्र, पेटंट डिझाईन आणि चेसिस पाहता तज्ञांचा अंदाज आहे की ही बाईक 2026 च्या आत भारतीय बाजारात येऊ शकते. यासाठी Honda ला पूर्ण नवीन बाईक डिझाईन करायची गरज नाही – सध्याच्या Shine 100 च्याच फ्रेममध्ये काही सुधारणा करूनच ही EV आणली जाईल.
Honda Shine Electric Bike Patent Leaks – Swappable Battery Like Active e https://t.co/PazNd3hfNt pic.twitter.com/Cwl1bUKV5P
— RushLane (@rushlane) July 17, 2025
Activa प्रमाणेच स्वॅप स्टेशनचं सपोर्ट
Honda Shine 100 Electric ला Activa Electric साठी तयार करण्यात आलेलं बॅटरी स्वॅपिंग नेटवर्कचा थेट फायदा मिळणार आहे. त्यामुळे युजर्सना चार्जिंगचा वेळ वाया घालवायची गरज नाही. जवळच्या स्वॅप स्टेशनवर जाऊन बॅटरी बदलून लगेच बाईक सुरू करता येईल.
Shine 100 Electric का ठरेल गेमचेंजर?
- 2 स्वॅपेबल बॅटऱ्या – प्रत्येक 10.2kg वजनाची
- पेट्रोल इंजिन नाही, तर आधुनिक इलेक्ट्रिक मोटर
- Shine 100 प्रमाणेच सिंपल आणि मजबूत चेसिस
- ECU सिस्टीममुळे स्मार्ट कंट्रोल
- आधीपासून अस्तित्वात असलेलं Honda चं स्वॅप नेटवर्क