
Honda SP 125 Sports Edition Bike Info In Marathi : होंडा कंपनीची आपली प्रसिद्ध बाईक Honda SP 125 चे नवीन स्पोर्ट्स एडिशन बाजारात उपलब्ध आहे. आकर्षक लुक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या या बाईकची सुरुवातीची किंमत 90,567 रुपये (एक्स-शोरूम) आहे. या बाईकच्या लाँचसोबतच कंपनीने अधिकृत डीलरशिप आणि वेबसाइटद्वारे अधिकृत बुकिंगही सुरू केली.
कंपनीने नवीन SP 125 स्पोर्ट्स एडिशनमध्ये (Honda 125 CC Bike Info In Marathi) काही कॉस्मेटिक बदल केले आहेत, ज्यामुळे ही बाईक नियमित मॉडेलपेक्षा वेगळी आहे. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक त्सुत्सुमु ओटानी म्हणाले, “होंडा SP 125 त्याच्या स्थापनेपासून प्रिमियम कम्युटर मोटरसायकल विभागात अॅडवान्स्ड फीचर्स, स्टायलिश डिझाइन आणि परफॉरम्ससाठी प्रसिद्ध आहे. आम्हाला आशा आहे की हे नवीन स्पोर्ट्स एडिशन ग्राहकांना आणखी आकर्षित करेल.”
फीचर्स (Honda SP 125 Sports Edition)
Honda SP 125 ला LED हेडलॅम्प, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर प्रदान केले गेले आहे, जे गियर पोजिशन, स्पीड, फ्यूल-गेज यांसारखी मूलभूत माहिती देते. याशिवाय बाइकच्या इंजिन मेकॅनिझममध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पूर्वीप्रमाणे, या बाईकमध्ये 123.94 cc क्षमतेचे सिंगल-सिलेंडर PGM-FI इंजिन आहे, जे 10.7 hp पॉवर आणि 10.9 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.
हेही वाचा – किआ सेल्टोस झाली महाग! कंपनीने वाढवल्या किंमती, येथे पाहा नवीन Price
10 वर्षांची वॉरंटी (Sports Edition Of Honda SP 125)
आपल्या इतर बाईक्सप्रमाणे, होंडा या मोटरसायकलला 7 वर्षांची मानक वॉरंटी देत आहे. याशिवाय 3 वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी दिली जात आहे, त्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील. एकूणच, ग्राहक या बाईकसह 10 वर्षांची वॉरंटी घेऊ शकतात. Honda SP 125 ची नवीन स्पोर्ट एडिशन डिसेंट ब्लू मेटॅलिक आणि हेवी ग्रे मेटॅलिक पेंट स्कीममध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.