HSRP नंबर प्लेट म्हणजे काय? कुठे आणि कशी कराल ऑनलाइन बुकिंग

WhatsApp Group

HSRP Number Plate : राज्यातील सर्व वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची सूचना! केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार आता सर्व प्रकारच्या वाहनांवर HSRP (High Security Registration Plate) लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जुन्या वाहनांनाही हा नियम लागू असून, दिलेल्या मुदतीनंतरही नियम पाळला नाही, तर ₹5000 पर्यंत दंड होऊ शकतो.

HSRP म्हणजे काय?

HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, ही खास नंबर प्लेट आहे जी अ‍ॅल्युमिनियमची बनवलेली असते आणि त्यावर लायफटाइम युनिक कोड, क्रोमियम बेस्ड होलोग्राम आणि लेझर एनग्रेविंग असते. ही प्लेट बनावट नंबर प्लेट आणि गाड्यांच्या चोरीला आळा घालण्यासाठी उपयुक्त ठरते.

कोणाला लावावी लागेल?

  • सर्व दुचाकी, चारचाकी, ट्रक, टॅक्सी, रिक्षा आणि अन्य गाड्या
  • जुनी गाड्याही यात समाविष्ट
  • गाडी खरेदी करताना नव्या वाहनांना HSRP बाय डिफॉल्ट मिळते, पण जुन्या वाहनांच्या मालकांनी ती स्वतंत्रपणे लावावी लागेल.

HSRP कुठे आणि कशी लावावी?

वाहनधारक https://bookmyhsrp.com या अधिकृत पोर्टलवरून आपली HSRP नंबर प्लेट ऑनलाइन बुक करू शकतात. तसेच अधिकृत डीलर किंवा RTO कार्यालयांमधूनही ही सुविधा मिळू शकते.

न लावल्यास काय दंड?

  • पहिल्या उल्लंघनासाठी ₹500 दंड
  • वारंवार उल्लंघनासाठी ₹1000 ते ₹5000 पर्यंत दंड

नागरिकांसाठी सूचना

गाडीवर HSRP नंबर प्लेट लावणं केवळ कायद्याचे पालन नाही, तर आपल्या वाहनाची सुरक्षा वाढवणारा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे ही प्लेट तात्काळ लावावी आणि पुढील कारवाईपासून वाचावं.

Leave a Comment