Hyundai च्या गाड्यांवर 31 तारखेपर्यंत डिस्काऊंट! 50 हजार वाचवण्याची संधी

WhatsApp Group

Hyundai Cars Discount Offers In Marathi : सणासुदीचा हंगाम जोर धरत असताना, कार उत्पादक कंपन्या त्यांच्या उत्पादनांवर विविध सवलती आणि ऑफर देत आहेत. ह्युंदाईचाही यात सहभाग आहे. ही कंपनी आपल्या कारवर अनेक प्रकारच्या ऑफर देत आहे, ज्यामध्ये रोख सूट देखील आहे. ही ऑफर ऑक्टोबर 2023 साठी वैध आहेत.

Hyundai i20 N Line

ह्युंदाई त्यांच्या i20 N Line च्या प्री-फेसलिफ्ट मॉडेलवर 50,000 रुपयांपर्यंत आणि नवीन N-Line वर 10,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. ही गाडी भारतात 9.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत लाँच करण्यात आली होती.

Hyundai Grand i10 Nios

Grand i10 Nios ही ह्युंदाईची लोकप्रिय कार आहे. कंपनी या हॅचबॅकवर 43,000 रुपयांच्या ऑफर देत आहे. Grand i10 Nios ची किंमत 5.84 लाख रुपयांपासून सुरू होते. ही गाडी सीएनजी व्हेरिएंटमध्येही विकली जाते.

Hyundai Aura

ऑरा फक्त Grand i10 प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. ही कॉम्पॅक्ट सेडान आहे. ह्युंदाई ऑक्टोबर 2023 मध्ये या सेडानवर 33,000 रुपयांच्या ऑफर देत आहे. भारतात त्याची थेट स्पर्धा मारुती सुझुकी डिझायर, टाटा टिगोर आणि होंडा अमेझ यांच्याशी आहे.

हेही वाचा – Maruti Suzuki चा धमाका! या गाड्यांवर 68 हजारांपर्यंत सूट, लगेच करा बूक!

Hyundai Verna

ह्युंदाई वेर्ना दीर्घकाळापासून मार्केटमध्ये आहे. कंपनीने अलीकडेच भारतात त्याचे अपडेटेड व्हेरिएंच लाँच केले आहे. ज्याची किंमत 10.96 लाख रुपयांपासून सुरू होते. सणासुदीच्या काळात वेर्नावर 25,000 रुपयांच्या ऑफर्स दिली जात आहे.

Hyundai Alcazar

ही क्रेटाच्या वरची SUV आहे. ही 7-सीटर SUV 1.5 लीटर पेट्रोल इंजिनसह 158bhp जनरेट करते, जी Kia Carens आणि Kia Seltos मध्ये देखील उपलब्ध आहे. सणासुदीच्या काळात ह्युंदाई त्यावर 20,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे.

Leave a Comment