
Hyundai Grand i10 NIOS CNG Launched : ह्युंदाईची प्रसिद्ध बजेट कार Grand i10 Nios देशात खूप पसंत केली जात आहे. आता ह्युंदाई मोटार इंडियाने ही कार सीएनजी व्हेरिएंटमध्ये देखील भारतीय बाजारात लाँच केली आहे. या कारमध्ये ट्विन सिलेंडर सीएनजी इंजिन आहे. या इंजिनच्या मदतीने आता लोकांना जास्त मायलेज मिळणार आहे. Hyundai Grand i10 Nios Hi-CNG Duo मध्येही दमदार फीचर्स आहेत.
इंजिन
यापूर्वी ह्युंदाईने Hyundai Exter CNG मध्ये ट्विन-सिलेंडर सीएनजी तंत्रज्ञानाचा वापर केला होता. या कारमध्ये मोठ्या सीएनजीऐवजी दोन छोटे सीएनजी सिलिंडर देण्यात आले आहेत, ज्यामुळे कारमध्ये अधिक बूट स्पेस मिळेल.
कंपनीने Hyundai Grand i10 NIOS Hi-CNG Duo मध्ये 1.2 लीटर द्वि-इंधन इंजिन दिले आहे. हे इंजिन 69 PS च्या कमाल पॉवरसह 95.2 Nm चा पीक टॉर्क निर्माण करते. तसेच, हे 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह जोडलेले आहे.
The Hyundai Grand i10 Nios CNG bi-fuel variant has been launched in India from ₹7.75 lakh.@HyundaiIndia #Grandi10Nios pic.twitter.com/u9mWjShsvP
— Car India (@CARIndia) August 2, 2024
हेही वाचा – 5-Door Mahindra Thar ROXX : 15 ऑगस्टला लाँच होतेय नवीन ‘महिंद्रा थार’, मिळणार 5 दरवाजे!
फीचर्स
ह्युंदाईच्या या कारमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये कंपनीने प्रोजेक्टर हेडलॅम्पसह एलईडी डीआरएल दिले आहे. त्यामध्ये एक एलईडी टेल लॅम्प देखील आहे. वैशिष्ट्यांनुसार, कारमध्ये शार्क फिन अँटेनासह सेमी-टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम प्रदान करण्यात आली आहे. तसेच, कारमध्ये फूटवेल लाइटिंग, टिल्ट स्टीयरिंग आणि रिअर एसी व्हेंट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
ह्युंदाईच्या या सीएनजी कारमध्ये 6 एअरबॅग्ज, एक रिअर पार्किंग कॅमेरा आणि टीपीएमएस देण्यात आला आहे. याशिवाय, यात IRVM, हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोलसह इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोलसारखे सेफ्टी फीचर्सदेखील आहेत.
किंमत
कंपनीने आपली नवीन CNG कार दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केली आहे. त्यात मॅग्ना व्हेरिएंट उपलब्ध आहे. दुसरे व्हेरिएंट स्पोर्ट ट्रिम आहे. कंपनीने मॅग्ना व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 7.75 लाख रुपये ठेवली आहे. या कारच्या स्पोर्ट ट्रिम व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 8.30 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र, या कारच्या सिंगल सिलिंडर सीएनजी व्हेरिएंटची विक्रीही सुरू ठेवली जाईल. ही कार बाजारातील अनेक सीएनजी कारशी टक्कर देऊ शकते.