Diwali 2024 : देशातील नंबर 1 बाईक कंपनी देतेय छप्परफाड ऑफर्स! जाणून घ्या

WhatsApp Group

Diwali 2024 Hero Bikes Offers : देशातील सर्वात मोठी बाईक उत्पादक Hero MotoCorp दिवाळीनिमित्त त्यांच्या बाईक्सवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. ज्यामध्ये तुम्हाला फायदे, रोख सूट आणि टीडीपी सारख्या ऑफर्स मिळतील. Hero MotoCorp ही देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्माता कंपनी आहे, हीरो देशात सर्वाधिक बाईक विकते. तर 100cc आणि 125cc बाईक्च्या सेगमेंटमध्ये हिरोने वर्चस्व राखले आहे. या सेगमेंटमध्ये, सर्व कंपन्या मिळून हिरो मोटोकॉर्पने जितक्या बाईक विकल्या आहेत तितक्या बाईक विकू शकलेल्या नाहीत.

हिरो करिझ्मा XMR

हिरो करिझ्मा XMR मध्ये 210cc इंजिन आहे. ही बाईक 35 किमी मायलेज देते आणि या बाईकमध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स आहे. या बाईकमध्ये 11 लीटरची इंधन टाकी आहे. KARIZMA XMR च्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर ती 1 लाख 80 हजार रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. दिवाळी ऑफरमध्ये, हिरो या बाईकवर 8,000 रुपयांपर्यंत रोख सूट आणि 14,999 रुपयांची LDP देत आहे.

हिरो स्प्लेंडर+

हिरो स्प्लेंडर ही कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी बाईक आहे. या बाईकमध्ये कंपनीने 97.2cc इंजिन दिले आहे जे 8.02 PS पॉवर आणि 8.05Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. ही बाईक 73 किमी मायलेज देते. या बाईकची किंमत 82,911 रुपये आहे, ज्यावर तुम्हाला 5000 रुपयांचा कॅशबॅक आणि 1999 रुपयांचा एलडीपी मिळेल.

हिरो पॅशन Xtec

Hero MotoCorp ची पॅशन बाईक खूप लोकप्रिय आहे. कंपनीने याचे अनेक अपडेटेड व्हेरिएंट लाँच केले आहेत. ज्यामध्ये पॅशन XTEC हा नवीनतम प्रकार आहे. या बाईकमध्ये 113.2cc इंजिन असून ही बाईक 58 किमी मायलेज देते. पॅशन XTEC बाईकची किंमत 81,498 रुपये आहे, ज्यावर तुम्हाला दिवाळी ऑफरमध्ये Rs 5000 चा कॅशबॅक आणि Rs 1999 चा LDP मिळेल. याशिवाय इतर हिरो बाईक आणि स्कूटरवरही सूट दिली जात आहे.

Leave a Comment