किआ सेल्टोस झाली महाग! कंपनीने वाढवल्या किंमती, येथे पाहा नवीन Price

WhatsApp Group

Kia Seltos 2023 Price Hike News In Marathi : दक्षिण कोरियाची ऑटो कंपनी किआने अलीकडेच त्यांच्या मध्यम आकाराच्या SUV सेल्टोसचे फेसलिफ्ट व्हेरिएंट लाँच केले, ज्याची किंमत 10.90 लाख ते 20 लाख रुपये होती. मात्र, आता कंपनीने निवडक व्हेरिएंटच्या किमती 30,000 रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत. याचे कारण म्हणजे कंपनीने दोन नवीन व्हेरिएंट आणले आहेत, ज्यामुळे किंमतीमध्ये बदल झाला आहे. या गाडीचे एंट्री-लेव्हल एचटीई मॅन्युअल व्हेरिएंट अद्यापही पूर्वीप्रमाणेच (रु. 10.90 लाख) उपलब्ध आहे, तर एक्स-लाइन ऑटोमॅटिक ट्रिम आता 20.30 लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या किंमती एक्स-शोरूम आहेत.

किआ सेल्टोस बद्दल…

नवीन किआ सेल्टोस (Kia Seltos 2023 Price Hike) मध्ये जोडलेली दोन महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे पॅनोरॅमिक सनरूफ आणि अॅडवान्सड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) तंत्रज्ञान. यात ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन कीप असिस्ट, फॉरवर्ड कोलायजन वॉर्निंग असिस्ट आणि बरेच काही समाविष्ट आहे. ही फीचर्स टॉप ट्रिममध्ये उपलब्ध आहेत.

इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, 6 एअरबॅग्ज, ऑल-व्हील डिस्क ब्रेक, हिल स्टार्ट असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि सर्व प्रवाशांसाठी तीन-पॉइंट सीट बेल्ट रिमाइंडर यासारख्या फीचर्ससह ही गाडी सज्ज आहे. यात 360-डिग्री कॅमेरा, रेन सेन्सिंग वायपर, ऑटो होल्डसह इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक देखील मिळतो.

हेही वाचा – Auto News : टाटा पंच, ह्युंदाई एक्स्टर आणि मारुती फ्रॉन्क्सचा वेटिंग पीरियड माहितीये?

नवीन किआ सेल्टोसमध्ये नवीन 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन देखील आहे, जे 160bhp आणि 253Nm जनरेट करते. हे 6-स्पीड iMT किंवा 7-स्पीड DCT ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह असू शकते. याशिवाय, SUV चे आधीच उपलब्ध इंजिन पर्याय कायम ठेवण्यात आले आहेत, ज्यात 1.5L पेट्रोल इंजिन (115bhp) आणि 1.5L टर्बो डिझेल इंजिन (116bhp) यांचा समावेश आहे. पेट्रोल युनिट 6-स्पीड मॅन्युअल आणि CVT गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे, तर डिझेल इंजिन 6-स्पीड IMT आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे.

Leave a Comment