
Know How To Increase SUV Mileage : एसयूव्ही गाड्या साधारणपणे मोठ्या आणि जड असतात. या कारणास्तव, त्यांच्यामध्ये शक्तिशाली इंजिन देखील प्रदान केले आहेत. त्यामुळे एसयूव्हीचे मायलेज खूपच कमी असते. टोयोटा फॉर्च्युनर सारख्या अनेक एसयूव्हीचे मायलेज 10 किमी प्रति लिटरपेक्षा कमी आहे. त्यामुळे एसयूव्ही वापरकर्त्यांच्या खिशावर अधिक भार पडतो.
जर एसयूव्ही मालकांनी काही युक्त्या वापरल्या, तर ते त्यांच्या गाडीटे मायलेज नक्कीच वाढवू शकतात. यासाठी एसयूव्ही मालकाला त्याच्या वाहनात कोणताही अतिरिक्त भाग जोडावा लागणार नाही. चला जाणून घेऊया SUV चे मायलेज वाढवण्याची युक्ती.
टायर प्रेशर
एसयूव्हीचे वजन आणि आकार दोन्ही जास्त असते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही टायर्समध्ये हवेचा योग्य दाब राखला नाही, तर गाडी चालवण्यासाठी इंजिनला जास्त मेहनत घ्यावी लागते, त्यामुळे इंजिनचा इंधनाचा वापरही वाढतो आणि एसयूव्हीचे मायलेजही कमी होते.
हेही वाचा – VIDEO : गाडीचं रनिंग 9 लाख 99 हजार 999 किमी…! मीटर 10 लाखाच्या पुढे जाईना, डीलर हैराण
वेग कायम ठेवा
शहरात आणि गर्दीच्या ठिकाणीही एसयूव्ही चालक भरधाव वेगाने गाडी चालवतात, असे अनेकवेळा दिसून आले आहे. यामुळे, त्यांना वारंवार ब्रेक लावावे लागतात आणि याचा गाडीच्या मायलेजवर नकारात्मक परिणाम होतो. इंधनाची बचत करायची असेल तर सुरळीत गाडी चालवावी. त्यामुळे गाडीचे मायलेज अधिक चांगले असेल.
नियमित इंजिन सर्व्हिसिंग
इंजिन चांगल्या स्थितीत ठेवल्याने त्याची कार्यक्षमता वाढते आणि इंधनाचा वापर कमी होतो. गलिच्छ एअर फिल्टर इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात. वेळोवेळी एअर फिल्टर साफ केल्याने इंधन कार्यक्षमता वाढते. तुमच्या गाडीमध्ये इको मोडचा पर्याय असल्यास, तो वापरा. हा मोड इंजिन कमी पॉवरवर चालवतो, ज्यामुळे मायलेज वाढते. या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या एसयूव्हीचे मायलेज वाढवू शकता.