बाईक खरेदी केलेल्या मालकांना आपल्या बाईकवर प्रेम असेल, तर त्यांना आपल्या बाईकच्या पार्ट्सची माहिती असणे आवश्यक आहे. बाईकचे सर्व पार्ट्स खूप महत्त्वाचे असले, तरी त्यांनी क्लच प्लेटची (Bike Clutch Plate Tips In Marathi) चांगली काळजी घेणे गरजेचे आहे. बाईकची क्लच प्लेट फ्लायव्हील, प्रेशर प्लेट आणि स्वतःमध्ये घर्षण निर्माण करते. त्यामुळे क्लच प्लेट महत्त्वाची ठरते. जर क्लच प्लेट खराब झाली, तर पैसेही जातात. बरेचदा लोक क्लच प्लेटची काळजी घेत नाहीत, ज्यामुळे ती घासली जाते आणि बाईक चालवताना त्रास होतो. त्यामुळे क्लच प्लेट दीर्घकाळ चांगली राहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या टिप्सचा अवलंब करू शकता.
योग्य वेळी गियर बदला
बाईक चालवताना योग्यरित्या गियर बदलणे महत्त्वाचे आहे. काही लोक ट्रॅफिकमध्ये बाईक चालवताना गीअर बदलत नाहीत, त्यामुळे क्लच प्लेट खराब होते. बाईक चालवताना वेगानुसार गियर बदलावा. जर बाईक जास्त स्पीड मध्ये असेल तर टॉप गियर मध्ये शिफ्ट करा आणि कमी स्पीड मध्ये बाईक लोअर गियर मध्ये चालवावी.
ब्रेक काळजीपूर्वक वापरा
बाईक थांबवण्यासाठी लोक अर्जंट ब्रेकचा वापर करतात. बाईकचा वेग जास्त असला आणि अचानक थांबण्यासाठी अर्जंट ब्रेकचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत क्लच प्लेट आणि ब्रेक खराब होण्याची समस्या उद्भवते. पण हे टाळण्यासाठी आधी बाईकचा वेग कमी करा आणि ती थांबवण्यासाठी क्लच आणि ब्रेकचा वापर करा.
हेही वाचा – गाडी खरेदी करायचा विचार करताय? Maruti Suzuki कडून ग्राहकांना धक्का!
झटकन क्लच सोडू नका
अनेक बाईक रायडर्स गियर बदलताना क्लच झटकन सोडतात. त्यामुळे बाईकची क्लच प्लेट खराब होते. ही चूक पुन्हा पुन्हा झाल्यास, क्लच प्लेट लवकर खराब होण्याची शक्यता आहे.
योग्य इंजिन ऑईल वापरा
बाईकमध्ये नेहमी योग्य इंजिन ऑइल वापरावे. बाईकच्या इंजिन ऑइलचा वापर स्कूटर किंवा स्कूटीमध्ये कधीही करू नये. कंपनीने सुचविल्याप्रमाणे तुमच्या बाईकमध्ये तेच इंजिन ऑईल वापरा. चुकीचे इंजिन ऑइल वापरल्याने क्लच प्लेटचे नुकसान होते.