Maruti Celerio Price Cut : भारतातील बजेट कार सेगमेंटमध्ये एक खास स्थान मिळवलेली मारुती सुझुकी Celerio आता आणखी स्वस्त झाली आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने आपल्या लोकप्रिय हॅचबॅकच्या किमतीत मोठी कपात केली आहे. ही कपात ₹94,000 पर्यंतची असून, त्यामुळे ही कार आता पूर्वीपेक्षा अधिक किफायतशीर झाली आहे.
94,000 रुपयांपर्यंत कपात: कोणत्या व्हेरियंटवर किती फायदा?
जीएसटी दरात बदल झाल्यानंतर Celerio च्या सर्व व्हेरियंटमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. यामध्ये:
- LXi (बेस व्हेरियंट): ₹94,000 पर्यंतची सर्वाधिक कपात
- ZXi Plus MT (टॉप एंड व्हेरियंट): ₹59,000 पर्यंतची कपात
हे मॉडेल मॅन्युअल आणि AMT (ऑटोमॅटिक) गिअरबॉक्स ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
हेही वाचा – टाटा मोटर्सवर सायबरहल्ला, जग्वार लँड रोव्हर कारखाना बंद करावा लागला, अब्जावधींचे नुकसान!
मॅन्युअल वर्जनमध्ये ₹59,000 ते ₹94,000 पर्यंत तर AMT वर्जनमध्ये ₹66,000 ते ₹89,000 पर्यंतची कपात झाली आहे.
फीचर्स आणि रंग पर्याय
Celerio चे नवे मॉडेल अधिक स्टायलिश आणि आकर्षक बनवण्यात आले आहे. ग्राहकांना विविध रंगपर्यायही मिळतात:
- स्पीडी ब्लू
- ग्लिस्टनिंग ग्रे
- आर्क्टिक व्हाइट
- सिल्की सिल्वर
- सॉलिड फायर रेड
- कैफीन ब्राउन
- पर्ल ब्लूइश ब्लॅक
इंजन आणि मायलेज
Celerio मध्ये 1.0-लीटर, 3-सिलिंडर नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळते. हे इंजिन 25.24 किमी/लीटर ते 26.68 किमी/लीटर मायलेज देते.
CNG व्हेरियंटमध्ये हेच इंजिन प्री-इंस्टॉल्ड CNG किटसह येते, जे तब्बल 34.43 किमी/किलो मायलेज देते – जे सेगमेंटमधील सर्वाधिक आहे.