Maruti Dzire Price Drop : 22 सप्टेंबरपासून मारुती सुझुकी डिजायरची किंमत मोठ्या प्रमाणात घसरली आहे. GST 2.0 लागू झाल्यानंतर ही सेडान कार ग्राहकांसाठी अधिक परवडणारी झाली आहे. आता डिजायरवर 28% GST व 1% सेसऐवजी फक्त 18% GST लागू केला गेला असून यामुळे ग्राहकांना थेट ₹87,000 पर्यंतचा लाभ मिळणार आहे. ही कपात आजपासून (22 सप्टेंबर 2025) लागू झाली आहे.
नवीन किंमती (Variant Wise)
| व्हेरिएंट | नवीन किंमत (₹) |
| LXI 1.2L 5MT | 6,25,674 |
| VXI 1.2L 5MT | 7,17,147 |
| ZXI 1.2L 5MT | 8,17,767 |
| ZXI+ 1.2L 5MT | 8,86,372 |
| VXI 1.2L AGS | 7,62,884 |
| ZXI 1.2L AGS | 8,63,504 |
| ZXI+ 1.2L AGS | 9,32,109 |
| VXI CNG 1.2L 5MT | 8,04,047 |
| ZXI CNG 1.2L 5MT | 9,04,667 |
डिझाईन आणि एक्सटीरियर फीचर्स
मारुती डिजायरमध्ये स्टायलिश मोठी फ्रंट ग्रिल, स्लिक एलईडी डीआरएल, आकर्षक एलईडी टेल लॅम्प आणि नवा 15-इंच ड्युअल टोन अलॉय व्हील देण्यात आला आहे.
हेही वाचा – EV बॅटरी फक्त 8 वर्षच चालते? खराब झाल्यावरही वापरता येते? जाणून घ्या
फिचर्सचा ‘फुल्ल’ धमाका
- 9-इंच टचस्क्रीन डिस्प्ले
- वायरलेस फोन चार्जर
- क्रूझ कंट्रोल
- भारतातील पहिली सब-कॉम्पॅक्ट सेडान जिच्यात सिंगल पॅन सनरूफ आहे.
सुरक्षेची हमी – 5-स्टार सेफ्टी!
मारुती डिजायरला ग्लोबल NCAP कडून फॅमिली सेफ्टीसाठी 5-स्टार रेटिंग मिळाली आहे.
यात 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोलसारखे अत्याधुनिक फीचर्स दिले आहेत.
मायलेजचा राजा – 30 किमीच्या पुढे!
- मॅन्युअल ट्रान्समिशन: 24.79 kmpl
- ऑटोमॅटिक ट्रान्समिशन: 25.71 kmpl
- CNG वर्जन: 30 km/kg पेक्षा जास्त
पॉवरट्रेन – दमदार इंजिन
1.2 लीटर, 3-सिलिंडर पेट्रोल इंजिन
- पॉवर: 81.58 bhp
- टॉर्क: 111.7 Nm
- CNG ऑप्शनही उपलब्ध