ऑक्टोबरमध्ये मारुतीचा मेगा डिस्काउंट धमाका! Fronx, Jimny, Grand Vitara आणि Invicto वर तब्बल ₹1.43 लाखांपर्यंत सूट

WhatsApp Group

Maruti Suzuki Discount October 2025 : भारताची सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki ने पुन्हा एकदा कार प्रेमींसाठी आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. ऑक्टोबर 2025 महिन्यात कंपनीने आपल्या Nexa डीलरशिप्स आणि Arena डीलरशिप्स मार्फत विकल्या जाणाऱ्या अनेक लोकप्रिय मॉडेल्सवर जबरदस्त सूट जाहीर केली आहे.

या ऑफर्सअंतर्गत ग्राहकांना ₹13,000 ते ₹1.43 लाखांपर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो. या सूट CNG आणि पेट्रोल दोन्ही व्हेरियंट्सवर लागू आहेत. चला, पाहू या कोणत्या Maruti कारवर किती लाभ मिळतोय..

Maruti Ignis

कंपनीची किफायती पण स्टायलिश हॅचबॅक Maruti Ignis च्या MT व्हेरियंटवर ₹43,000 पर्यंत सूट, तर AMT व्हेरियंटवर ₹48,000 पर्यंतचा लाभ मिळत आहे. ही गाडी शहरातील ड्रायव्हिंगसाठी सर्वाधिक पसंत केली जाते.

Maruti Baleno

प्रिमियम हॅचबॅक Baleno वर देखील मोठी सूट जाहीर करण्यात आली आहे. पेट्रोल व CNG व्हेरिएंटवर ₹40,500 ते ₹45,500 पर्यंत डिस्काउंट मिळत आहे. AMT व्हेरियंट खरेदी करणाऱ्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे.

Maruti Fronx

स्पोर्टी SUV Maruti Fronx वर तब्बल ₹60,000 पर्यंत सूट देण्यात आली आहे. त्यातील Turbo व्हेरियंटवर ₹73,000 पर्यंत लाभ मिळू शकतो, तर CNG व्हेरियंटवर ₹23,000 ते ₹38,000 पर्यंत ऑफर आहे. तरुण खरेदीदारांमध्ये ही गाडी विशेष लोकप्रिय आहे.

हेही वाचा – एका बापाच्या संयमाचा अंत, पेट्रोल टाकून शो रूमसमोर पेटवली ओला स्कूटर!

Maruti Grand Vitara

हायब्रिड SUV प्रेमींसाठी खास ऑफर!
ऑक्टोबर महिन्यात Grand Vitara Delta (पेट्रोल/डिझेल) व्हेरियंटवर ₹83,000 पर्यंत सूट आहे, तर Zeta/Alpha हायब्रिड व्हेरियंट्सवर ₹1.13 लाखांपर्यंतचा जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. या ऑफरमध्ये ₹50,000 एक्सचेंज बोनस आणि ₹50,000 कंझ्युमर बेनेफिट समाविष्ट आहे.

Maruti XL6

कंपनीची प्रीमियम MPV Maruti XL6 वर ₹43,000 पर्यंत सूट देण्यात आली आहे. कुटुंबासाठी योग्य असलेली ही गाडी या सवलतीनंतर अधिक आकर्षक ठरत आहे.

Maruti Jimny

ऑफ-रोड SUV चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!
Maruti Jimny Alpha व्हेरियंटवर ₹88,000 पर्यंत सूट असून यात ₹75,000 कंझ्युमर ऑफर आणि ₹10,000 कॉर्पोरेट बेनेफिट समाविष्ट आहे.  तर Zeta व्हेरियंटवर ₹13,000 पर्यंतचा लाभ मिळू शकतो.

Maruti Invicto

टोयोटा Innova Hycross चा बॅज-इंजिनियर्ड व्हेरिएंट असलेला Maruti Invicto सध्या सर्वाधिक सवलतीत मिळणारी कार ठरली आहे. या गाडीच्या Alpha+ व्हेरियंटवर ₹1.43 लाख तर Zeta व्हेरियंटवर ₹1.18 लाख सूट आहे. प्रिमियम फीचर्स आणि विश्वासार्ह परफॉर्मन्समुळे ही गाडी खूप मागणीची ठरत आहे.

Maruti Ciaz

सेडान प्रेमींसाठी चांगली बातमी!
Ciaz च्या सर्व व्हेरियंट्सवर ₹38,000 पर्यंतचा डिस्काउंट देण्यात आला आहे. या गाडीची आरामदायक राईड आणि प्रीमियम इंटिरियर हेच तिचं मोठं वैशिष्ट्य आहे.

टीप

डिस्काउंट ऑफर शहर आणि डीलरशिपनुसार बदलू शकतात.
खरेदीपूर्वी आपल्या जवळच्या Maruti Suzuki डीलरशिपशी संपर्क साधून अचूक माहिती घ्या.

Leave a Comment