Maruti Victoris : भारतीय ऑटोमोबाईल बाजारात Maruti Suzuki ही विश्वासार्ह आणि लोकप्रिय कंपनी म्हणून ओळखली जाते. सप्टेंबर महिन्यात कंपनीने आपली नवी मिड-साइज SUV Maruti Victoris भारतीय बाजारात लाँच केली आणि अवघ्या काही आठवड्यांतच या गाडीने ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. लाँचनंतर केवळ दोन महिन्यांत 30,000 पेक्षा जास्त युनिट्सची विक्री होताच Victoris ही Maruti साठी एक मोठी यशोगाथा ठरली आहे.
Maruti Victoris का ठरतेय ग्राहकांची पहिली पसंती?
Maruti Victoris ही SUV आकर्षक डिझाइन, आधुनिक फीचर्स, दमदार इंजिन आणि किफायतशीर किंमत यामुळे वेगाने लोकप्रिय होत आहे. शहरात वापरासाठी तसेच लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही SUV योग्य असल्याने तरुण, कुटुंबीय आणि ऑफिस गोअर्स सर्वांमध्ये ती पसंतीस उतरते आहे.
फीचर्सच्या बाबतीत Victoris आहे एक पाऊल पुढे
Maruti Victoris मध्ये कंपनीकडून प्रीमियम आणि हाय-टेक फीचर्सचा भरणा करण्यात आला आहे. यामध्ये:
- LED हेडलाइट्स व LED DRLs
- कनेक्टेड रियर टेल लाइट्स
- शार्क फिन अँटेना
- 26.03 सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर
- अंडरबॉडी CNG किट
- Dolby Atmos साउंड सिस्टम
- जेस्चर कंट्रोल टेलगेट
- एंबियंट लाइटिंग
- Alexa Auto Voice Assistant
- 35+ कनेक्टेड कार फीचर्स
- पॅनोरॅमिक सनरूफ
- व्हेंटिलेटेड सीट्स
इंटीरियरमध्ये ब्लॅक, ग्रे आणि सिल्व्हर थीम वापरल्यामुळे गाडी अधिक प्रीमियम वाटते.
सुरक्षेच्या बाबतीत किती विश्वासार्ह आहे Victoris?
Maruti Victoris मध्ये सुरक्षिततेलाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. SUV मध्ये खालील सेफ्टी फीचर्स दिले आहेत:
- 6 एअरबॅग्स
- ABS आणि EBD
- ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज
- Level-2 ADAS (Advanced Driver Assistance System)
या फीचर्समुळे Victoris कुटुंबासाठी सुरक्षित पर्याय ठरते.
हेही वाचा – E20 पेट्रोलने इंजिन खराब होतं? नितीन गडकरी काय म्हणाले बघा!
इंजिन आणि परफॉर्मन्स
Maruti Victoris मध्ये 1.5 लीटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन:
- 75.8 kW पॉवर
- 139 Nm टॉर्क
निर्माण करते. याशिवाय ही SUV Strong Hybrid आणि CNG व्हेरिएंट मध्येही उपलब्ध असून मायलेज आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा उत्तम समतोल साधते.
किंमत किती आहे Maruti Victoris ची?
Maruti Suzuki ने Victoris ही SUV स्पर्धात्मक किमतीत सादर केली आहे.
- सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत: ₹10.50 लाख
- टॉप व्हेरिएंटची किंमत: ₹19.98 लाख (एक्स-शोरूम)
या किमतीत मिळणारे फीचर्स पाहता Victoris ही “Value for Money SUV” ठरते.
कोणत्या SUV सोबत आहे थेट मुकाबला?
Maruti Victoris चा मिड-साइज SUV सेगमेंटमध्ये थेट सामना पुढील गाड्यांशी होतो:
- Hyundai Creta
- Kia Seltos
- Honda Elevate
- Tata Sierra
- Volkswagen Taigun
तरीही विक्रीच्या आकड्यांवरून Victoris ने स्पर्धकांना कडवे आव्हान दिले आहे.